घरदेश-विदेशराऊत म्हणतात; लोकसभा उपाध्यक्ष पदावर आमचाच नैसर्गिक हक्क

राऊत म्हणतात; लोकसभा उपाध्यक्ष पदावर आमचाच नैसर्गिक हक्क

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर लोकसभा उपाध्यक्ष पदावर आमचा नैसर्गिक हक्क असल्याचे सांगत उपाध्यक्ष पदावर दावा केला आहे.

केंद्रीय अवजड उद्योग खाते मिळाल्यानंतर नाराज असलेल्या शिवसेनेची नाराजी आता अधिकच वाढू लागली आहे. त्यामुळे आता शिवसेनेने लोकसभा उपाध्यक्षपदावर दावा केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर लोकसभा उपाध्यक्ष पदावर आमचा नैसर्गिक हक्क असल्याचे सांगत उपाध्यक्ष पदावर दावा केला आहे. भाजपाप्रणीत एनडीएमध्ये शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकांचा घटक पक्ष आहे. त्यामुळे उपाध्यक्ष पद हे शिवसेनेकडेच हवे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात शिवसेनेचे मनोहर जोशी हे उपाध्यक्ष होते. त्यामुळे आताही उपाध्यक्ष पद मिळावे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

भावना गवळी यांच्या नावाची चर्चा 

दरम्यान, उपाध्यक्ष पदावर दावा करणाऱ्या शिवसेनेकडून वाशिम-यवतमाळ मतदारसंघातील खासदार भावना गवळी यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. सध्या भावना गवळी या लोकसभेतील शिवसेनेच्या सर्वात ज्येष्ठ सदस्या आहेत. भाजपाला लोकसभेत बहुमत मिळाले ही आनंदाची बाब आहे. पण मित्रपक्षांच्या संख्याबळाचाही आदर करणे महत्त्वाचे असते, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. एवढंच नाही तर लोकसभेमध्ये शिवसेनेचे १८ आणि राज्यसभेत ३ खासदार आहे. त्यामुळे फक्त एक मंत्रीपद देणे हे योग्य नाही, असेदेखील राऊत यांनी सांगत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

शिवसेनेला अवजड खाते नको 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबई मतदारसंघातील शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना मिळालेल्या अवजड उद्योग खात्यावर शिवसेना नाखुश असून, अरविंद सावंत यांच्याकडे आणखी एक खाते सोपवा, अशी शिवसेनेची भूमिका असून, उपाध्यक्ष पदही शिवसेनेलाच हवे आहे. त्यामुळे आता भाजपा शिवसेनेला उपाध्यक्ष पद देणार का, हे पहाणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -