घरदेश-विदेशशिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री ठाकरेंची फोनवरून चर्चा

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री ठाकरेंची फोनवरून चर्चा

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर बंड केले आहे. ते सध्या गुजरातमधील सुरत येथील एका हॉटेलमध्ये आहेत. त्याची समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर सुरतमध्ये पोहोचले होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून जवळपास 40 मिनिटे त्यांच्याशी चर्चा केली.

या चर्चे दरम्यान फोनवरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात देखील संवाद झाल्याची माहिती मिळाली आहे. मी आतापर्यंत पक्षाविरोधी कोणतंही पाऊल उचलले नाही.त्यामुळे मला गटनेते पदावरून का काढण्यात आले असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारल्याचे देखील समजते आहे. तसेच संजय राऊत यांच्यावर देखील नाराजी व्यक्ती केल्याची माहिती समजत आहे. संजय राऊत प्रत्यक्षात एक आणि माध्यमांत दुसरे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

यावेळी मला मुख्यमंत्री पदाची कोणतीही लालसा नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना-भाजप युती व्हावी, यात गैर काय आहे? मी अद्याप कुठलीही पक्षविरोधी कारवाई केली नाही. कोणताही वेगळा गट स्थापन केलेला नाही. कोणत्याही पक्षाचे सदस्यत्व स्वीकारलेले नाही. तरीही माझ्यावर कारवाई का झाली?, असे प्रश्न एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्र्यानी घातली समजूत –

- Advertisement -

यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मुंबईत परत या, आपण समोरासमोर चर्चा करू, चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेऊ, सर्वकाही सुरळीत होईल, तुम्ही चिंता करू नका, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढल्याचे समजत आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -