घरदेश-विदेशशिवसेनेचा भाजपवर 'विश्वास'; खासदारांना बजावला व्हिप

शिवसेनेचा भाजपवर ‘विश्वास’; खासदारांना बजावला व्हिप

Subscribe

संसदेतील अविश्वास दर्शक ठरावावेळी शिवेसेना भाजपला साथ देईल असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिले आहे. त्यामुळे कुरघोडीचे राजकारण विसरून शिवसेनेने भाजपवर 'विश्वास' दाखवला आहे.

अविश्वासदर्शक ठरावावेळी आम्ही तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिले आहे. टीडीपीने बुधवारी केंद्र सरकाविरोधात अविश्वास ठराव मांडला. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी टीडीपीचा ठराव दाखल करून घेतल्याने भाजपपुढे राजकीय पेच उभा राहिला होता. त्यामुळे बहुमताच्या काठावर असलेल्या भाजपच्या उरात धडकी भरली होती. यावेळी मित्र पक्षांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. अशा वेळी शिवसेने साथ देण्याचे आश्वासन दिल्याने भाजपचा जीव भांड्यात पडला असेल हे नक्की! शुक्रवारी अविश्वास दर्शक ठरावावेळी शिवसेनेने भाजपला साथ द्यावी यासाठी अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला. फोनवर झालेल्या चर्चेदरम्यान शिवसेना भाजपच्या अर्थात सरकारच्या बाजुने मतदान करेल असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांनी दिले आहे. शिवाय, टीडीपीने दाखल केलेल्या अविश्वास ठरावावेळी खासदारांनी उपस्थित राहावे यासाठी शिवसेनेने व्हिप देखील बजावला आहे. त्यामुळे सर्व रूसवे – फुगवे विसरून शिवसेना भाजपला साथ देणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र सरकारने आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याने टीडीपी अर्थात तेलगु देसम पार्टीने केंद्र सरकारविरोधात अविश्वास दर्शक ठराव दाखल केला होता. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देखील ठराव दाखल करून घेतल्याने नाराज मित्र पक्ष काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळातील सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

टीडीपीचा अविश्वासदर्शक ठराव

१० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी एकेकाळी भाजपचा मित्र पक्ष असलेल्या टीडीपीने आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न मिळाल्याने बुधवारी केंद्र सरकार विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. लोकसभा अध्यक्षांनी ठराव दाखल देखील करून घेतला. त्यामुळे अविश्वासदर्शक ठरावावेळी मित्र पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपचे मित्रपक्ष नाराज असल्याने मित्रपक्षांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार होती. पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळे भाजपचे संख्याबळ २८२ वरून २७२वर आली परिणमी मित्रपक्षांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार होती. पण शिवसेनेने पाठिंबा दिल्याने भाजपचा संख्याबळाचा प्रश्न तरी मिटला आहे.

- Advertisement -

तुझं – माझं जमेना तुझ्यावाचून करमेना  

चार वर्षापासून शिवसेना आणि भाजप सत्तेमध्ये आहेत. पण एकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही संधी दोघांनी सोडली नाही. नाराज शिवेसेने स्वबळाचा नारा देखील दिला. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये डावलले जात असल्याने राज्यासह केंद्रात देखील नाराज आहे. मंत्रिमंडळ विस्तारावेळी देखील शिवसेनेला मंत्रीपद न मिळाल्याने नाराजीत आणखी भर पडली. दरम्यान पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेना भाजपविरोधात महागाई,नाणार प्रकल्प,इंधर दरवाढ आदी प्रश्नावर आक्रमक अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. टीडीपीने दाखल केलेल्या अविश्वास ठरावावेळी शिवसेना विरोधात मतदान करून भाजपला खिंडीत गाठणार अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली गेली होती. पण शिवसेने सर्व चर्चांना पुर्णविराम देत अविश्वासदर्शक ठरावावेळी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला. शिवाय तसा व्हिप देखील बजावण्यात आला आहे.

शिवसेनेचं नक्की चाललंय काय?

नाराज शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी तब्बल अडीच तास दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. पण त्या चर्चेचा तपशील अद्यापही समोर आलेला नाही. अमित शहा यांच्या मातोश्रीवारी नंतर देखील शिवसेनेने स्वबळाचा नारा कायम ठेवला. शिवाय वेळोवेळी सामनातून देखील टीका करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेचा नक्की चाललंय तरी काय? असा प्रश्न आता सामान्य लोक विचारू लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -