घरदेश-विदेशधक्कादायक! तिरंग्याने पुसले टेबल-खुर्च्या, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर नेटकरी संतापले

धक्कादायक! तिरंग्याने पुसले टेबल-खुर्च्या, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर नेटकरी संतापले

Subscribe

मेजर सुरेंद्र पुनिया यांनी हा व्हिडिओ जारी केला असून हा बेशरम व्यक्ती कोण आहे?जो तिरंग्यासोबत असं करू शकतो त्याच्यासोबत काय केलं पाहिजे? असा प्रश्न विचारत त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

नवी दिल्ली – भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) नुकताच साजरा झाला. यानिमित्ताने सर्वांनीच तिरंग्याला वंदन केले. भारतीयांच्या मनात तिरंग्याविषयी अतोनात प्रेम असून तिरंग्याचा (Tricolor) अपमान करणे हा दंडनीय अपराध आहे. मात्र, एका व्यक्तीने तिरंग्याचा कापडासारखा वापर करत टेबल पुसण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर आपले खराब झालेले हातही त्याने तिरंग्याला पुसले. हा व्हिडिओ सोशल मीडिया तुफान (Viral Video On Social Media) व्हायरल झाला असून यामुळे नेटकरी प्रचंड संतापले आहेत.

हेही वाचा BBC Gujarat Riots Documentary : सर्वोच्‍च न्‍यायालयात 6 फेब्रुवारी रोजी होणार सुनावणी

- Advertisement -

मेजर सुरेंद्र पुनिया (Major Surendra Puniya) यांनी हा व्हिडिओ जारी केला असून हा बेशरम व्यक्ती कोण आहे?जो तिरंग्यासोबत असं करू शकतो त्याच्यासोबत काय केलं पाहिजे? असा प्रश्न विचारत त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या हातातील तिरंग्याने टेबल आणि खुर्ची साफ करत आहे. दरम्यान, या ठिकाणी एक व्यक्तीही येतो, मात्र तोही त्याला असं करण्यावाचून अडवत नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी अधिक संताप व्यक्त केला.


हा व्हिडीओ प्रसिद्ध होताच नवी मुंबई पोलिसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नवी मुंबई पोलिसांशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करा असं नवी मुंबई पोलिसांनी मेजर पुनिया यांना सांगितलं आहे.

- Advertisement -

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा गूगलनंतर फिलिप्समध्ये होणार मोठी नोकरकपात; ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांचा बुडणार रोजगार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -