घरताज्या घडामोडीगूगलनंतर फिलिप्समध्ये होणार मोठी नोकरकपात; 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा बुडणार रोजगार

गूगलनंतर फिलिप्समध्ये होणार मोठी नोकरकपात; ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांचा बुडणार रोजगार

Subscribe

मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली कर्मचारी कपात थांबायचे नाव घेत नाही आहे. नुकताच गूगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीने 12000 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला होता.

मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली कर्मचारी कपात थांबायचे नाव घेत नाही आहे. नुकताच गूगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीने 12000 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आता मेडिकल टेक निर्माता कंपनी फिलिप्सने सोमवारी जगभरातील 6000 नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आहे. (Philips Cuts 6000 Jobs After Sleep Device Recall Losses Deepen)

मिळालेल्या माहितीनुसार, स्लीप डिव्हाइस रिकॉलमुळे झालेल्या ताज्या नुकसानीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. फिलिप्सचे सीईओ रॉय जॅकब्स यांनी एका निवेदनात 2025 पर्यंत कर्मचाऱ्यांची सध्या आणखी कमी करण्याची योजना जाहीर केली आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

याआधी म्हणजेच तीन महिन्यांपूर्वीही कंपनीने 4 हजार नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली होती. यादरम्यान फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांनी एका निवेदनात सांगितले की, उत्पादकता वाढवण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून आम्ही जागतिक स्तरावर आमचे सुमारे 4000 कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई आगामी काळात घेणार मोठा निर्णय

- Advertisement -
गूगलचे सीईओ सुंदर पिचाई आगामी काळात कंपानातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याच्या तयारीत आहेत. टाऊन हॉल येथे एक बैठक झाली. या बैठकीत गूगलच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना “वरिष्ठ पदावरील सर्व कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बोनसमध्ये कपात करण्यात येणार आहे”, असे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले.
सुंदर पिचाई यांच्या घोषणेनंतर आता कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात देखील कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुगलने फक्त वार्षिक बोनसमध्ये कपातीची घोषणा केली आहे. मासिक पगारातील वेतनाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
वरिष्ठांच्या बोनस कपातीची टक्केवारी किती असेल आणि किती काळ तशीच राहिल याविषयी सुंदर पिचाई यांनी काही सांगितले नाही. कर्मचारी कपातीच्या काही आठवड्यांपूर्वी पिचाई यांना मोठी वेतनवाढ मिळाली होती. गूगलची मूळ कंपनी अल्फाबेटकडून ही वाढ मिळाली होती.

हेही वाचा – 12000 कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर गूगल ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; वाचा सविस्तर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -