घरदेश-विदेशसोळा वर्षीय मुलाचं डोकं फिरल तोंडातून आला फेस; कोरोना लस घेतल्यावर झाला...

सोळा वर्षीय मुलाचं डोकं फिरल तोंडातून आला फेस; कोरोना लस घेतल्यावर झाला साईड इफेक्ट!

Subscribe

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात राहावा, यासाठी लसीकरण मोहिम वेगवान सुरू आहे. मात्र मध्यप्रदेशातून असा एक प्रकार समोर आला आहे, जो ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. मध्य प्रदेशातील मुरेनामध्ये १६ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लस दिल्याचे समोर आले आहे. लस दिल्यानंतर मुलाची तब्येत अचानक बिघडली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याच्या तपासाचे आदेशही देण्यात आले आहेत.

असा घडला प्रकार

ही अश्चर्यकारक घटना मुरैना जिल्ह्यातील अंबाह येथील आहे, जिथे कमलेश कुशवाह नावाच्या व्यक्तीचा मुलगा पिल्लूला कोरोनाची लस देण्यात आली होती. मुरैना जिल्हा मुख्यालयापासून साधारण ३५ किमी अंतरावर असलेल्या एका केंद्रावर ही लस देण्यात आली. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लस दिल्यानंतर पिल्लूचे डोके फिरले आणि तोंडातून फेस येऊ लागला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी ग्वाल्हेरला पाठवण्यात आले.

- Advertisement -

या घटनेनंतर पिल्लूच्या कुटुंबाने लसीकरण केंद्रात गोंधळ सुरू केला. मुरैनाचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CM&HO) डॉ. एडी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही याचा तपास करत आहेत की तो ग्वाल्हेरला गेला की नाही. कारण तो ग्वाल्हेरला जाण्याऐवजी आपल्या घरी गेला असल्याचे काही अहवालांवरून आम्हाला कळले आहे. तसेच त्यांनी असेही सांगितले की, रविवारी सकाळी पिल्लूच्या घरी एक टीम पाठवण्यात आली होती आणि या घटनेचा तपास सुरू आहे. डॉ शर्मा पुढे असेही म्हणाले की, ‘वय कमी असताना देखील कोरोनाची लस कशी मिळाली हे शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.


Covaxin लसीची कमतरता दूर करण्यासाठी Bharat Biotech आंतरराष्ट्रीय भागीदाराच्या शोधात

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -