घरदेश-विदेशश्रीनगरमधील HMT भागात सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

श्रीनगरमधील HMT भागात सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

Subscribe

श्रीनगरमधील HMT भागात सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

श्रीनगरच्या खुसीपोरा, एचएमटी येथे लष्कराच्या क्विक Reaction टीमवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. ज्या परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला तो परिसर दाटीवाटीचा असल्याने नागरिकांना इजा होऊ नये यासाठी भारतीय सैन्य दलाने संयम ठेवला. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचे दोन जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

- Advertisement -

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला दुपारी करण्यात आला. लष्कराची क्यूआरटी टीम अबन शाह एचएमटी चौकात पोहोचली तेव्हा मारुती कार अचानक जवानांच्या वाहनाजवळ उभी राहिली आणि गाडीत बसलेल्या अतिरेक्यांनी सैन्याच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या अचानक हल्ल्यामुळे सुरक्षा दलालाही सावरता आले नाही. या गोळीबारात लष्कराचे दोन जवान गंभीर जखमी झाले. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला सैनिकांनी प्रत्युत्तर देण्यापूर्वीच कारमधील दहशतवादी गोळीबार करुन तेथून पळून गेले.

दहशतवाद्यांचं पलायन

काश्मीरचे आयजी म्हणाले, “तीन दहशतवाद्यांनी आमच्या सैन्य दलावर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात दोन जवान गंभीर जखमी झाले होते. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या परिसरात आपल्या दहशतवादी कारवाया वाढवल्या आहेत. हे दहशतवादी हल्ला केल्यावर कारमधून पळून गेले आहेत आणि त्यांच्याकडे शस्त्र आहेत. या तिघांपैकी दोन बहुतेक पाकिस्तानी आणि एक स्थानिक आहे.”

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -