घरदेश-विदेशCoronaVirus: कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या १०८ जणांचा स्टाफ क्वारंटाईन

CoronaVirus: कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या १०८ जणांचा स्टाफ क्वारंटाईन

Subscribe

या १०८ लोकांमध्ये डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफचा समावेश

भारतातील कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून तो ३००० वर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन देखील घोषित करण्यात आला असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोना व्हाययरसपासून रूग्णांचा बचाव करण्यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक दिवस रात्र काम करत आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये असणाऱ्या सर गंगाराम रुग्णालयातील स्टाफच्या १०८ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या १०८ लोकांमध्ये डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफचा समावेश आहे. कोरोना व्हायरस रुग्णांच्या संपर्कात आल्याने रुग्णालयाने हा निर्णय घेतला आहे. या रूग्णालयातील दोन लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. जे कोरोना रूग्णांवर उपचार करत होते. या रूग्णांमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणं नव्हती, मात्र त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

खबरदारीचा उपाय म्हणून स्टाफला केले क्वारंटाइन

या दोन रूग्णांच्या उपचारासाठी येणाऱ्या डॉक्टरांसह इतर स्टाफला रूग्णालयाकडून खबरदारी म्हणून क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रूग्णालयातील १०८ रूग्णांपैकी २३ जणांना रूग्णालयामध्येच क्वारंटाईन करण्यात आले आहे तर ८५ जणांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३८६ वर पोहोचली आहे. त्या रूग्णांपैकी ९ जणं बरी झाले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.


दिल्लीतील एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरला कोरोनाची लागण!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -