घरताज्या घडामोडीलहान मुलांना स्मार्टवॉच घालताय तर तुमच्यासाठी 'ही' महत्त्वाची बातमी

लहान मुलांना स्मार्टवॉच घालताय तर तुमच्यासाठी ‘ही’ महत्त्वाची बातमी

Subscribe

आतापर्यंत आपण फक्त स्मार्टफोनमधील बॅटरीचा स्फोट झाल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत आणि पाहिल्या आहेत. पण आता अशाच प्रकारच्या बातम्या स्मार्टवॉच संदर्भात देखील येऊ लागल्या आहेत. नुकतेच झालेल्या एका घटनेने गॅजेट्समध्ये बॅटरी फुटल्याने एक नवीन दहशत पुन्हा निर्माण झाली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार स्मार्टवॉचमधील बॅटरी फुटल्याने एका चिमुकलीचे मनगड थर्ड-डिग्रीपर्यंत जळाल्याचे समोर आले आहे. या चिमुकलीला रुग्णालयात नेण्यात आले असून तिचे स्किन ग्राफ्ट केले आहे. स्मार्टवॉचमध्ये बॅटरीचा स्फोट होण्याची ही घटना चीनमध्ये घडली आहे.

- Advertisement -

कसा घडला प्रकार?

चीनच्या क्वानझोउ शहरातील एक चिमुकली यियी हुआंगसोबत या आठवड्याच्या सुरुवातील ही घटना घडली आहे. याहू न्यूज ऑस्ट्रेलियानुसार, या महिन्याच्या सुरुवातील ही घटना घडली. त्यावेळेस चिमुकली आपल्या काकाच्या मुलासोबत खेळत होती. तेव्हा तिच्या आजीला जोरदार स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर ओरडण्याचा आवाज आला. जेव्हा आजी काय झालं पाहण्यासाठी नातीकडे गेली, तेव्हा हवेत धूर आणि जळल्याचा वास येत होता. हे सर्व काही स्मार्टवॉच बॅटरीच्या स्फोट झाल्यामुळे घडले. या घटनेनंतर स्मार्टवॉच मनगटातून काढून टाकून चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटामुळे चिमुकलीच्या हाताच्या मागचा भाग थर्ड-डिग्रीपर्यंत जळाला आहे. त्यामुळे स्किन ग्राफ्ट करावे लागले आहे. ही घटना घडल्यामुळे चिमुकलेचे वडील स्मार्टवॉच कंपनीसोबत बातचित करत आहेत. त्यामुळे मुलांना स्मार्टवॉच घालताना सावध राहा.


हेही वाचा – अभिमानास्पद! ३ मिनिटे १० सेकंदात चिमुकलीने ओळखले १९५ देशांचे ध्वज आणि राजधानी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -