घरदेश-विदेशसोमालियामध्ये पुन्हा बॉम्बस्फोट; चार जणांचा मृत्यू

सोमालियामध्ये पुन्हा बॉम्बस्फोट; चार जणांचा मृत्यू

Subscribe

अल-शबाबा या अतिरेकी संघटनेने हा हल्ला केला आहे. प्राधिकरणाच्या वाहनात सर्व अभियंते होते. त्यामुळेच या वाहनावर हल्ला करण्यात आला. या ह्ल्ल्यासाठी स्फोटकांचा वापर करण्यात आला. या हल्ल्यात चारही अभियंते मारले गेले. त्यानंतर प्राधिकरणाच्या अन्य वाहनांना पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत.

सोमालिया सिमेजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक पोलीस कमांडर जॉर्ज सेडा यांनी या बॉम्बस्फोटाची माहिती दिली.

गरिसा-बुरा रोडवर बुधवारी ही घटना घडली. केनियाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वाहनाने एका स्फोटकाला धडक दिली. त्यामुळे झालेल्या स्फोटात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस कमांडर सेडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल-शबाबा या अतिरेकी संघटनेने हा हल्ला केला आहे. प्राधिकरणाच्या वाहनात सर्व अभियंते होते. त्यामुळेच या वाहनावर हल्ला करण्यात आला. या ह्ल्ल्यासाठी स्फोटकांचा वापर करण्यात आला. या हल्ल्यात चारही अभियंते मारले गेले. त्यानंतर प्राधिकरणाची अन्य वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. पोलिसांच्या देखरेखी खाली आता प्राधिकरणाची वाहने आहेत. अल-शबाबा अतिरेकी संघटनेकडून वारंवार केनियावर हल्ले होत आहेत, अशी माहिती पोलीस कमांडर सेडा यांनी दिली.

- Advertisement -

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे झालेल्या दोन बॉम्बस्फोटात सुमारे १०० जणांचा मृत्यू झाला होता तर ३०० जण जखमी झाले होते. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी हा हल्ला झाला होता. हा हल्ला झाला त्यादिवशी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर वरिष्ठ अधिकारी हिंसक अतिरेक्यांना विरोध करण्यासाठी बैठक घेणार होते. या हल्ल्याची जबाबदारी अल-शबाबा या संघटनेने स्विकारली नव्हती. मात्र राष्ट्राध्यक्ष हसन शेख मोहम्मद यांनी या हल्ल्याला क्रूर आणि भ्याड असल्याचे म्हणत दहशतवादी संघटना अल-शबाबला जबाबदार धरले होते. सोमालियाची राजधानी मोगादिशू दोन कारमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. घटनास्थळी मृतदेहांचा खच पडला होता. ज्यात महिलांची संख्या अधिक होती. त्याआधी पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता. ज्यामध्ये ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

सोमालिया येथे वारंवार अतिरेकी हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमध्ये शेकडो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अतिरेकी हल्ले रोखण्यासाठी तेथील प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. अतिरेक्यांना मिळणारी हत्यारे व पैसा याचाही तपास केला जात आहे.

- Advertisement -

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -