घरमहाराष्ट्रबॅलेस्टिक अहवालाबाबत कोणतीही माहिती नाही, मी गोळीबार केला नाही; सदा सरवणकरांची प्रतिक्रिया

बॅलेस्टिक अहवालाबाबत कोणतीही माहिती नाही, मी गोळीबार केला नाही; सदा सरवणकरांची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबईतील प्रभादेवी परिसरात ठाकरे गट आणि शिंदे गटातील राड्यादरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत बॅलेस्टिक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, तो गोळीबार आमदार सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून झाल्याचं उघड झालं आहे. मात्र असा कोणत्याही प्रकारचा अहवाल मला मिळालेला नाही असं म्हणत मी गोळीबार केला नसल्याची ठाम भूमिका आज आमदार सदा सरवणकर यांनी मांडली आहे. या अहवालावर सदा सरवणकर आज माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणासंदर्भातील अहवालाची चौकशी करत सत्यता पडताळून बोलेन. सर्वांशी बोलाव लागेल कारण तो विषय बराच चालला आहे. पण अद्याप माझ्यापर्यंत त्याबाबत काही आलेलं नाही, मी फक्त मीडियाच्या माध्यमातून ऐकतोय. मी अडचणीत येण्याचा काही अडचणी नाही कारण तसा काही रिपोर्टचं माझ्यापर्यंत आलेला नाही, या सगळ्याची सत्यता पडताळल्याशिवाय बोलणं उचित ठरणार नाही, असं सरवणकर म्हणाले आहेत.

- Advertisement -

मी गोळीबार केला नाही, पण तसा अहवाल आला असेल तर तो माझ्यापर्यंत पोहचलेला नाही. मी गोळीबार केला नाही यावर ठाम असून पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं तर सहकार्य करेन, अस स्पष्टीकरणही सरवणकरांनी दिलं आहे.

२०२२ मध्ये प्रभादेवीमध्ये गणेश विजर्सन मिरवणुकीदरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबाराची घटना घडली. त्यावेळी हा गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप झाला. मात्र सरवणकरांनी त्यांच्याविरोधातील हे आरोप फेटाळून लावले. ज्यावरून बरचं राजकारणही रंगल. अशात आता बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ज्या बंदुकीतून हा गोळीबार झाला ती बंदुक सदा सरवणकर यांचीच होती, असं उघड झाल आहे.


सोमालियामध्ये पुन्हा बॉम्बस्फोट; चार जणांचा मृत्यू

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -