घरदेश-विदेशया पुढे गाड्यांचे 'कागदपत्र' बाळगण्याची गरज नाही

या पुढे गाड्यांचे ‘कागदपत्र’ बाळगण्याची गरज नाही

Subscribe

डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे कळत आहे. मोटर वाहन कायद्यात हा नवा बदल केल्यामुळे 'वेळ' आणि 'कागद' दोन्ही वाचेल.

ट्राफिक पोलिसांनी थांबवले की, त्यांना गाडीची सगळी कागदपत्रे दाखवावी लागतात आणि पोलिसांचे समाधान होईपर्यंत त्यातून तुमची सुटका होणे जरा कठीणच असते. पण कागदपत्रांचे हे किट बाळगायची आता काहीच गरज नाही कारण आता पोलिसांनी इ- कागपत्रे स्विकारावी असा बदल केंद्राकडून सुचवण्यात आला असून येत्या दोन दिवसात रस्ते व वाहतूक विभागाने या बदलांची अमंलबजावणी करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे पोलिसांनी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ही कागदपत्रे दाखवू शकता.

पेपरलेस कामासाठी एक पाऊल

डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे कळत आहे. मोटर वाहन कायद्यात हा नवा बदल केल्यामुळे’वेळ’ आणि ‘कागद’ दोन्ही वाचेल. शिवाय दंडही कॅशलेस स्विकारल्यामुळे भ्रष्टाचारही होणार नाही. या कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने पीयुसी आणि इन्शुरन्स पेपर असतात. हे पेपर ऑनलाईन अपलोड केल्यानंतर वारंवार आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. त्यामुळे मोबाईलवर तुम्ही तुमची कागदपत्रे दाखवू शकता.

- Advertisement -

ट्रकची होणार चाचणी

कागदपत्रांच्या बाबतीत जरी तुमची सुटका झाली असतील तरी, लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे नियम मात्र जाचक करण्यात आले आहेत. नॅशनल परमिटच्या गाड्यांना ट्रॅकिंग सिस्टीम लावणे बंधनकारक असणार आहे. शिवाय ८ वर्ष जुन्या गाडयांना फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. दोन वर्षातून एकदा ही फिटनेस टेस्ट होईल तर त्याहून जुन्या गाड्यांना दरवर्षी या चाचणीला सामोरे जावे लागतील.

उघडे ट्रक बंद करा

पर्यावरणाचा विचार करता आणखी एक प्रस्ताव रस्ते वाहतूक विभागाने ठेवला आहे. जर मालवाहू गाड्या सिमेंट, माती, वाळू वाहून नेत असतील तर त्यांना गाड्या झाकून नेणं गरजेचे असणार आहे. ते झाकण्यासाठी ताडपत्री किंवा त्यासारख्या वस्तूंचा वापर करावा, कारण उघड्या ट्रकमधून वाळू, माती, सिमेंट हवेत मिसळते आणि त्याचा इतरांना त्रास होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -