‘डोहाळे’ पुरवू कसे! अमृताला लागले वेध…

अभिनेत्री अमृता खानविलकरला आता 'मावशी' बनण्याचे वेध लागले आहेत. नुकतेच अमृताने तिच्या बहिणीच्या डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

amruta khanvilkar sister baby shower
अमृता खानविलकर (सौजन्य-इनस्टाग्राम)

मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवणारी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. ग्लॅमडॉल अमृता खानविलकर सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे अमृता खानविलकरच्या घरी येणारा छोटा पाहुणा. अमृताची मोठी बहिण आदिती खानविलकर लवकरच आई बनणार आहे. नुकतंच आदितीचं डोहाळ जेवळ अगदी थाटात पार पडलं. यावेळेचे काही खास फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अमृताची आई, बहिण, स्वत: अमृता आणि तिचे वडील एकत्र दिसत आहेत. अमृताने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केलेल्या या ‘फॅमिली’ फोटोला, इन्स्टाग्रामवर भरभरुन पसंती मिळते आहे. याशिवाय अमृताने डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमामधील स्वत:चा खास ‘ड्रेशिनल’ लूकही शेअर केला आहे. या फोटोत निळ्या रंगाची साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केलेल्या अमृताचा सुंदर लूक पाहायला मिळतो आहे.

अमृताची मोठी बहिण आदिती खानविलकर, ही पेशाने एअर होस्टेस असून दीपक बक्षी असं तिच्या नवऱ्याचं नाव आहे. आदिती आणि दीपक दुबईमध्ये वास्तव्याला असतात.

amruta khanvilkar sister baby shower
डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात अमृताची हॅपी फॅमिली (सौजन्य-इन्स्टाग्राम)
amruta khanvilkar sister baby shower
कार्यक्रमामधला अमृताचा क्लासी लूक (सौजन्य-इन्स्टाग्राम)

नुकत्याच येऊन गेलेल्या ‘राझी’ सिनेमातून अभिनयाची वेगळी छटा दाखवलेली अमृता, आता ‘सत्यमेव जयते’ या आगामी सिनेमातही झळकणार आहे. अमृताची ‘डॅमेज गर्ल’ हे वेबसिरीजसुद्धा सध्या चांगलीच गाजते आहे. या वेबसिरीजमधून अमृताचा बोल्ड अवतार प्रेक्षकांसमोर आला आहे.