घरदेश-विदेशहैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालय!

हैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालय!

Subscribe

हैदराबादमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हैदराबादमध्ये एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला निर्घृणपणे जाळून मारल्याच्या प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच आरोपींनी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जावी अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेलंगणामधील मेहबूबनगर कोर्टामध्ये हे विशेष न्यायालय स्थापन होणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी रात्री पशुवैद्यक असलेल्या या तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर कुणाला सापडू नये म्हणून तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकला. या घटनेनंतर सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या मदतीने पोलिसांनी या चारही नराधमांना अटक केली असून त्यांनी आपला गुन्हा पोलिसांकडे कबूल देखील केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हैदराबाद बलात्कार प्रकरण: माझ्या मुलाला जाळून टाका-आरोपीची आई

२८ नोव्हेंबर रोजी सकाळी हैदराबादमधल्या शादनगर परिसरात एका ब्रिजच्या खाली पीडितेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेमध्ये आढळून आला होता. पीडिता रात्रीच्या सुमारास एका पेट्रोल पंपावर लावलेली तिची गाडी नेण्यासाठी आली असता त्यातली हवा यापैकी एकाने आधीच काढून ठेवली होती. त्यानंतर त्यातल्या एकाने मदतीचा बहाणा करून तिच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तिचं अपहरण करून तिला एका ट्रकमध्ये नेलं. तिच्यावर वारंवार सामुहिक बलात्कार केला. नंतर कुठेही वाच्यता होऊ नये, म्हणून एका पेट्रोल पंपावरून पेट्रोल घेऊन तिला एका निर्जन स्थळी नेऊन जाळून टाकलं. या भीषण प्रकारामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात असून सर्वच स्तरातील नागरिकांकडून घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जात आहे.

हैदराबाद बलात्काराप्रकरणी मुंबईत आंदोलन

हैदराबाद बलात्काराप्रकरणी मुंबईत आंदोलन

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 3, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -