घरदेश-विदेशश्रीनगरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; इंटरनेट सेवा बंद!

श्रीनगरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; इंटरनेट सेवा बंद!

Subscribe

२ वर्षांत पहिल्यांदा श्रीनगरमध्ये रात्री उशिरा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चमकम

जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी दोन वर्षांत पहिल्यांदा रात्री उशिरा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. श्रीनगरमधील नवाकदल भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलामध्ये ही चकमक झाली. यानंतर श्रीनगरमधील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहेत. सुरक्षा दल आणि पोलिसांनी मिळून दहशतवाद्यांविरोधी केलेल्या ऑपरेशनदरम्यान त्यांच्यावर गोळीबार केला. काही दहशतवादी तेथील घरांमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवान-पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, याआधी रविवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ताहिर अहमद भटला ठार करण्यात आले होते. ११ दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या रियाज नायकू नंतरची ही दुसरी मोठी चकमक होती.

- Advertisement -

जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्विट करत या चकमकीच्या बातमीला दुजोरा दिला असून जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान नवाकदल मधील कनेमझार या भागात आहेत.


अम्फान वादळाचा मुक्काम बुधवारपर्यंत; होणार सुपर सायक्लॉनमध्ये रुपांतर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -