घरदेश-विदेशकाँग्रेसच्या 'सावरकर समझा क्या...' ट्विटरला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर

काँग्रेसच्या ‘सावरकर समझा क्या…’ ट्विटरला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी सकरकारच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे भाजपाकडून राहुल गांधींच्या विधानावर टीका करताना राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र काँग्रेसकडून राहुल गांधींच्या भूमिकेच समर्थन करताना राहुल गांधींचा एक फोटो ट्विट केला होता. या ट्विटरला भाजपाने जसाचतसे उत्तर देताना ट्विट करून राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान भाजपचे चिन्ह, आरएसएसचे चिन्ह आणि सावरकर यांच्यावर टीका केली होती. त्यांना म्हटले होते की, दोन-तीन वर्षे अंदमानात बंदिस्त असताना सावरकर यांनी आम्हाला माफ करा, तुम्हाला जे हवे ते आमच्याकडून घ्या, अशी पत्र लिहायला सुरुवात केली. तसेच मला तुरुंगातून बाहेर काढा, असे म्हणत त्यांनी सावरकरांनी इंग्रजांसमोर गुडघे टेकले होते, असे राहुल गांधींनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

- Advertisement -

राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजपाने त्यांना माफी मागण्याचे आवाहन केले होते. परंतु राहुल गांधींनी माफी मागणार असे म्हटले. त्यानंतर काँग्रेस पक्षाने राहुल गांधींचे समर्थन करताना एक ट्विट केले आहे. या ट्विटरमध्ये काँग्रेसने राहुल गांधींचा कारमध्ये बसलेला एक फोटो शेअर करताना “सावरकर समझा क्या? नाम राहुल गांधी है”, असे ट्विट केले आहे. या ट्वीटला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपाने पहिले ट्विट शेअर करताना म्हटले की, खर आहे, तुम्ही सावरकर होऊच शकत नाही! विर सावरकर हे तेजस्वी, तपस्वी, स्वातंत्रवीर आणि युगपुरुष होते. सावरकरांना स्वातंत्र्यवीर उपाधी देशातील जनतेने दिली आहे. तुमच्या सारख आडनाव चोरून ते ‘गांधी’ झाले नाहीत.

- Advertisement -

दुसऱ्या एका ट्विटमध्ये  भाजपाने काही ओळी लिहिल्या आहेत आणि एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. भाजपने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, काँग्रेसच्या युवराजांचे हाल काहीसे असे झाले आहेत की, ‘घटक्यात घोड्यावर तर घटक्यात गाढवावर’, माफिवीर @RahulGandhi तुम्ही याआधी अनेक वेळा माफीच्या रूपाने उताणे पडला आहात. कदाचित यावेळीतर तोंडावर पडाल. तसेच व्हिडिओमध्ये राहुल गांधींनी भाई और बहनो मर जाऊंगा लेकीन माफी नही मागुंगा असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांनी राफेलवर खोटे बोलल्याची कबुली दिली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, त्यावेळी मी रागात बोललो पण मला आता पश्चाताप होत आहे. तसेच राहुल गांधींनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफीही मागितली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -