घरदेश-विदेशSubramanian Swamy On PM : "...फक्त श्रेय घेण्यासाठी येणार", सुब्रह्मण्यम स्वामींची पंतप्रधान...

Subramanian Swamy On PM : “…फक्त श्रेय घेण्यासाठी येणार”, सुब्रह्मण्यम स्वामींची पंतप्रधान मोदींवर टीका

Subscribe

पंतप्रधान खरेच राम आणि राम मंदिराबद्दल ऐवढे गंभीर असतील, तर त्यांनी राम सेतूला राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून घोषित करावा", अशी मागणी भाजपाचे नेते आणि खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन आणि रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोमवारी (23 जानेवारी) करण्यात आली. राम मंदिरानंतर ज्ञानवापी मशिदी, काशी विश्वनाथ मंदिर आणि कृष्ण जन्मभूमी मथुरा येथे मंदिर पुन्हा बांधण्याची परवानागी मिळावी म्हणून मी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी तातडीने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. यासाठी मोदी काहीच करणार नाही. पण नंतर मोदी श्रेय घेण्यासाठी येणार येतील, अशी टीका भाजपाचे नेते आणि खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींना सुब्रह्मण्यम स्वामींनी टीका केल्यामुळे भाजपामधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

राम मंदिरासाठी अशोक सिंघल यांनी सांगितल्यानंतर मी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. पण राम मंदिरासाठी आंदोलन करणाऱ्या पंतप्रधानांनी निमंत्रण दिले नाही. यावर सुब्रह्मण्यम स्वामींनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे सुब्रह्मण्यम स्वामींनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींवर टीका केली. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटले, “ज्ञानवापी काशी विश्वनाथ मंदिर आणि कृष्ण जन्मभूमी मथुरा येथे पुन्हा मंदिर बांधण्याची परवानगी मिळवण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेण्यासाठी मी प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी मोदी लढाई लढणार नाही, पण श्रेय घेण्यासाठी नक्की येतील”, अशी टीका सुब्रह्मण्यम स्वामींनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : श्यामाप्रसाद मुखर्जी राजकारणातला तुमचा बाप, त्यांच्याबद्दल बोला; ठाकरेंचे भाजपाला आव्हान

- Advertisement -

राम सेतूला राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून घोषित; स्वामींची मागणी

राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदींनी 11 दिवसांचे व्रत केले होते. यावरून सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, “पंतप्रधान खरेच राम आणि राम मंदिराबद्दल ऐवढे गंभीर असतील, तर त्यांनी राम सेतूला राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून घोषित करावा”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -