घरदेश-विदेशदिशा सालियन मृत्यू प्रकरणी सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

Subscribe

कोर्टाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सोमवारी एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. कोर्टाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत ही याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. सोबतच, सुप्रीम कोर्टात याचिकाकर्त्यांना हायकोर्टात जाण्याचाही सल्ला दिला आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यांकडून याचिका मागे घेण्यात आली.

याचिकाकर्त्यांच्या दाव्यानुसार, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरण एकमेकांशी संबंधित आहे. कारण दोघांचाही मृत्यू संशयास्पद अवस्थेत झाला आहे, असे याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते. मुंबईच्या उच्च पदस्थ पोलीस अधिकार्‍यांना या प्रकरणातील तपासाचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणीही या याचिकेद्वारे करण्यात आली होती. मुंबई पोलिसांचा अहवाल सदोष आढळला तर हे प्रकरण सीबीआयला हस्तांतरीत केले जावे, अशीही मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती.

- Advertisement -

मागच्या सुनावणीतच खंडपीठाने याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात दाद मागण्याचा विचार करण्याचा सल्ला याचिकाकर्त्यांना दिला होता. गेल्या दोन सुनावणीत या याचिकेसंदर्भात कुणीही कोर्टासमोर हजर झाले नव्हते, असेही कोर्टाने नोंदवले होते. या टिप्पणीसोबतच खंडपीठाने पुनीत कौर ढांडा यांच्याकडून दाखल करण्यात आलेली जनहित याचिका एका आठवड्यासाठी स्थगित केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -