घरदेश-विदेशराम मंंदिराच्या प्रश्नावर ४ जानेवारीला सुनावणी

राम मंंदिराच्या प्रश्नावर ४ जानेवारीला सुनावणी

Subscribe

४ जानेवारी रोजी अयोध्येच्या प्रश्नावर आता सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या याचिकेवर आता ४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे. अयोध्येप्रश्नी तात्काळ आणि वेळेत सुनावणी व्हावी अशी विनंती करण्यात आल्यानंतर आता ४ जानेवारी रोजी ही सुनावणी होणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं जानेवारी २०१९ मध्ये अयोध्याप्रश्नावर सुनावणी होईल अशी माहिती दिली होती. त्यामुळे अयोध्येतील प्रश्नावर केव्हा सुनाणी होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. अयोध्येमध्येतील राम मंदिरावरून सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. राम मंदिर आणि मस्जिद यावरून जोरात वाद सुरू आहेत. याबाबत अनेक दावे – प्रतिदावे केले जात आहेत. शिवाय, अयोध्येमध्ये राम मंदिर झालंच पाहिजे अशी मागणी देखील सध्या हिंदुत्नवाद्यांकडून होताना दिसत आहेत. पण, हा सारा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ठ आहे. पण, आता ४ जानेवारीपासून अयोध्येच्या प्रश्नावर सुनावणी होणार आहे.

 वाचा – राम मंदिर, कर्जमाफी हवी – उद्धव ठाकरे

वाचा – राम मंदिराला विरोध केल्यास सरकार पाडू – स्वामी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -