घरदेश-विदेशसूरतमधील आग प्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल

सूरतमधील आग प्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल

Subscribe

सूरत येथील सार्थना परिसरात लागलेल्या आगीत २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल घडली. या आग प्रकरणी सूरत पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सूरत येथील सार्थना परिसरात लागलेल्या आगीत २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल घडली. या आग प्रकरणी सूरत पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. येथील तक्षशिला इमारतीला लागलेल्या आग प्रकरणी हर्शल वेकारिया आणि जिग्नेश या दोन बिल्डरसह कोचिंग क्लासचे मालक भार्गव भुतानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी कोचिंग क्लासचे मालक यांना अटकदेखील करण्यात आली असल्याची माहिती सूरतचे पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, काल लागलेल्या आगीत १९ विद्यार्थ्यांसह एकाचा मृत्यू झाला असून आणखी २० विद्यार्थ्यी जखमी असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -