घरताज्या घडामोडीकाबुलमध्ये विमानातून पडणाऱे 'ते'दोघे आहेत सख्खे भाऊ

काबुलमध्ये विमानातून पडणाऱे ‘ते’दोघे आहेत सख्खे भाऊ

Subscribe

विमानाने उड्डाण करताच तीनजण विमानातून पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यातील दोघे सख्खे भाऊ(१६, १७) असल्याचे समोर आले आहे.

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाणि नागरिकांनी देशाबाहेर पळण्यासाठी काबुल विमानतळावर एकच गर्दी केली. यावेळी अमेरिकेच्या C-17 लष्करी विमानात प्रवेश न मिळाल्याने बिथरलेले नागरिक विमानाच्या चाकावर बसले तर काहीजणांनी मिळेल तो कोपरा पकडत विमानाचा तळ गाठला. मात्र विमानाने उड्डाण करताच दोन तीनजण विमानातून पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यातील दोघे सख्खे भाऊ(१६, १७) असल्याचे समोर आले आहे. त्यातील एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोघांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

रविवारी १५ ऑगस्टला तालिबान्यांनी काबुल शहरावर कब्जा केला. त्यानंतर अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात गेल्याची घोषणा करण्यात आली होती. तालिबानी ही अत्याचारी संघटना असल्याने अफगाणि नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडून पळत आहेत. तसेच ज्या देशांचे नागरिक अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत त्या देशांनी त्यांना मायदेशी नेण्यासाठी विमान पाठवले होते. अमेरिकेनेही अफगाणिस्तानात अडकलेल्या अमेरिकी नागरिकांसह अफगाणि नागरिकांना नेण्यासाठी लष्करी विमान पाठवली होती. त्यावेळी विमानतळावर हजारोंच्या संख्येने आलेल्या अफगाणि नागरिकांनी विमानात प्रवेश मिळवण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्याच गर्दीत दोन सख्खे भाऊही होते. अमेरिका सर्व अफगाणि नागरिकांना अमेरिकेत आणि कॅनडात नेणार असल्याचे त्यांना कळाले. यामुळे या दोघा भावांनी विमानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना आत जाता आले नाही. यामुळे त्यातील एकजण विमानाच्या एका चाकावर बसला. तर दुसरा दुसऱ्या चाकाजवळ. पण विमान काही उंचावर गेल्यानंतर मात्र यातील एकजण आणि त्याच्यामागोमाग दुसराही विमानातून पडले. त्यांच्या विमानातून पडत असतानाचा व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला असून त्यावर सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यातील एकाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून दुसऱ्याचा मृतदेह अद्याप सापडला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -