घरलाईफस्टाईलHealth Tips: पावसाळ्यात वाढतेय सांधे दुखीचे प्रमाण, 'हे' करा उपाय फॉलो करत...

Health Tips: पावसाळ्यात वाढतेय सांधे दुखीचे प्रमाण, ‘हे’ करा उपाय फॉलो करत मिळवा आराम

Subscribe

बदलती जीवशैली आणि धकधकीच्या जीवनामुळे अनेकदा आपल्या स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढते. यात सांधे दुखीची समस्या अनेकांना जाणवतेय. कितीही उपाय केले तरी ही सांधेदुखी थांबण्याचे नाव घेत नाही. विशेषत: पावसाळ्यात वाढत्या सांधी दुखीमुळे सामान्य कामं करणही कठीण जाते. यावर दिल्लीतील हाडांचे डॉक्टर अश्विनी मॅचंद यांनी गुडघेदुखीवर विस्तृत माहिती दिली आहे.

सांधे दुखीसंबंधीत वेदना या ऋतुनुसार बदलत असतात. त्यामुळे थंड वातावरणात सांधे दुखीचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात अनेकांना गुडघेदुखी, हाडांचे दुखणे, रक्त गोठणे यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. कारण दिवसांत वातावरणात मोठे बदल होत असून थंडावा अधिक वाढतो. त्यामुळे रक्त वाहिन्यांमधील रक्तदाबाचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे दैनंदिन कामं करणं देखील कठीण होते.

- Advertisement -

पावसाळ्यात का वाढते हाडांचे दुखणे?

या थंड वातावरणात डी-हायड्रेशनचे प्रमाण वाढते. त्यामुळे हाड्यांच्या सांध्यांभोवती असणाऱ्या द्रव पदार्थाचे प्रमाण कमी होते आणि असह्य वेदना होतात. ६० वर्षावरील सर्वाधिक नागरिकांना या सांधेदुखीचा सामना करावा लागतो. त्यामुळे सांधेदुखीच्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे गरजेचे आहेत. यामुळे स्नायूंचे दुखणे आणि सांधेदुखीच्या आजारापासून कायमचा आराम मिळवू शकतात.

सांधेदुखीवर ‘हे’ उपाय कर मिळवा आराम

१) सांध्यांवर तेलाने हळूवार मालिश करा, ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन वाढते.

- Advertisement -

२) थंड वातावरणात अधिक वेळ राहू नका. कारण थंड वातावरणात सांधेदुखीचे प्रमाण वाढते.

३) नियमित व्यायाम करा.

४) रोज सकाळी जॉगिंग, किंवा पायांना आराम देणारे व्यायाम करा.

५) हिरव्या भाज्या, बियाणे, माशांचा आहारांत समावेश करा.

६) धान्य, बदाम, अक्रोडचे तुकडे, फळे खाण्यास विसरु नका, मिठाई, लोणचे. केक, पेस्ट्री खाणे टाळा.

७) शीतपेय, डब्बा बंद खाद्यपदार्थ खाणे टाळा.

८) दिवसातून जमेल तितक्यावेळी पाणी प्या.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -