घरदेश-विदेशआता फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा - राजनाथ सिंह

आता फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा – राजनाथ सिंह

Subscribe

काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यावर भारताचे यापुढेचे लक्ष पाकव्याप्त काश्मीर असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यावर भारताचे यापुढेचे लक्ष पाकव्याप्त काश्मीर असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात पाकिस्तानसोबत संवाद झाला यात तो पाकव्याप्त काश्मीर याच मुद्द्यावर होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कलम ३७० हे काश्मीरच्या विकासात अडथळा बनू पाहत होते. त्यामुळे ते हटवण्यात आले. मात्र सध्या शेजारील ही भारताने केलेली चूक आहे, असे सांगत आंतराराष्ट्रीय समुदायाची दारे ठोठावीत आहे. मात्र पाकिस्तानशी संवाद झाला तर तो फक्त त्यांनी दहशतवादी संघटनांना बळ न देण्याच्या मुद्द्यावर होईल. पण आता तो संवाद पाकव्याप्त काश्मीरच्या प्रश्नावरही होणार असल्याचे ठणकवायलाही ते विसरले नाहीत. हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘जन आशीर्वाद यात्रेच्या’ कार्यक्रमात ते बोलत होते. ही यात्रा संपूर्ण हरियाणातील ९० विधानसभा मतदार संघातून जाणार आहे. त्यात रोहतक इथे ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या रॅलीचा समावेश आहे.

- Advertisement -

राजनाथ सिंह यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरदेखील यासंबंधीची पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर आमचा एक शेजारचा देश बिथरला आहे आणि सर्व देशांची मदत मागत फिरत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले राजनाथ सिंह

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत बालाकोटपेक्षाही मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे विधान केले. याचाच अर्थ बालाकोटमध्ये भारताने काय केले हे पाकिस्तानचे पंतप्रधान पूर्ण जाणून आहेत. भारताने अणुशक्तीचा वापर करण्याच्या नियमाच्या बदलाविषयी चाचपणी केल्यावर लगेचच त्यांचे विधान आले. कलम ३७० रद्द करणे आमच्या एका शेजाऱ्याला चांगलेच झोंबले आहे. आता त्याची तब्येत बिघडली असून तो वरचेवर दुबळा होत चालला आहे. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी जगभरातील देशांच्या दारात जाऊन उभा राहत आहे. आता आम्ही असा काय गुन्हा केला? ज्यामुळे ते आम्हाला सारख्या धमक्या देत आहेत. परंतु, जगातील सर्वात शक्तिशाली मानला जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनीही सांगितले की जावा, भारताबरोबर बसून चर्चा करा, इकडे येण्याची गरज नाही.

दरम्यान, कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून सुरू असणारी आगळीक खपवून घेणार नाही, असे संरक्षणमंत्र्यांनी आधीच सुनावले आहे. तसेच आतापर्यंत भारताचे पहिल्यांदा अण्वस्त्रे वापरणार नाही असे धोरण होते मात्र भविष्यात तसे राहिलच याची खात्री नाही, परस्थितीनुसार तसा विचारही केला जाऊ शकतो, अशी अप्रत्यक्ष धमकीच राजनाथ सिंह यांनी शेजारी पाकिस्तानला दिली आहे.

हेही वाचा –

Video: जेएनयूला मोदींचे नाव द्या; भाजप नेत्याची मागणी

भारताच्या एकमेव रणरागिणीची ३०० पाकिस्तान्यांशी झुंज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -