घरदेश-विदेशटाटांचा महत्त्वपूर्ण निर्णय; 'जिंजर' हॉटेलची वास्तू उभारणार महिला ब्रिगेड

टाटांचा महत्त्वपूर्ण निर्णय; ‘जिंजर’ हॉटेलची वास्तू उभारणार महिला ब्रिगेड

Subscribe

सध्या भारतीय हॉटेल्स क्षेत्रात टाटा समूह आघाडीवर आहे. टाटा समूह हॉटेल्स क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज भारतातील निम्म्या लोकसंख्येला टाटा समूहाने नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे भारतीयांची मनं जिंकणारा टाटा समूह शेअर मार्केटमध्येही मालामाल होत आहे.

अशातच टाटा समूहाने महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टाटा समूहात आत्ता पुरुषांप्रमाणे महिलांनाही नोकरीची समान संधी दिली जाणार आहे. यापूर्वीपासूनचं टाटा समूहातील एका प्रकल्पामध्ये महिला या पुरुषांच्यासोबतीने काम करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान टाटा समूह आता महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे. टाटा समूहात २०३० पर्यंत ३० टक्के महिला कर्मचाऱ्यांना संधी देण्यासाठी काम सुरु आहे. यासाठी टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल कंपनीने एक नवा निर्णय घेतला आहे. सांताक्रूझ येथे बांधण्यात येणाऱ्या ग्रुपच्या जिंजर हॉटेलच्या बांधकामाची जबाबदारी महिलांकडे सोपावली आहे.पुरुषांची मक्तेदारी असलेल्या बांधकाम क्षेत्रात महिलांना संधी देण्याचे टाटाचे हे क्रांतिकारक पाऊल असल्याचे बोलले जात आहे.

टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत छतवाला यांनी सांगितले की, या कंपनीत सर्वांना समान संधी उपलब्ध करुन देण्य़ासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. महिला सर्व क्षेत्रात पुढे जात आहे. टाटा समूहासोबत ही भागीदारी करण्यात येत आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथील जिंजर हॉटेल बांधकामात महिलांना संधी देण्याचा आम्हाला अभिमान आहे.

- Advertisement -

मुंबईतील सांताक्रूझ येथील जिंजर हॉटेल हे १९००० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर बांधले जाईल, ३७१ खोल्यांचे हे हॉटेल १९ महिन्यांत पूर्ण केले जाईल. या हॉटेलसाठी सर्व महिला टीम काम करणार आहे. विशेष म्हणजे हे जिंजर हॉटेल मुंबई विमानतळ आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या अगदी जवळ असेल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -