घरदेश-विदेशVideo: धावत्या ट्रेनमध्ये चढत असाल तर सावधान!

Video: धावत्या ट्रेनमध्ये चढत असाल तर सावधान!

Subscribe

तेलगंणा आणि हैदराबाद स्थानकावर एक प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा प्लेटफॉर्ममध्ये पाय अडकला. यादरम्यान आरपीएफच्या जवानांने त्यांचे प्राण वाचवले.

सतत आपल्याला रेल्वे स्टेशनवर सूचना दिल्या जातात की, चालत्या ट्रेनमध्ये चढून नका. तसंच ट्रेन स्टेशनवरुन जात असताना ट्रेन पासून दूर उभे राहा नाहीतर अपघात होऊ शकतो, अशा अनेक सूचना दिल्या जातात. पण काहीजण या सूचनाकडे दूर्लक्ष करतात. असं काही घडलं आहे तेलगंणा आणि हैदराबादच्या रेल्वे स्थानकावर. ही घडना पाहून तुम्ही देखील हैरान व्हाल. एक व्यक्ती तेलगंणा आणि हैदराबादच्या रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान त्या व्यक्तीचा पाय घसरला आणि ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये पाय अडकला. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढत असताना ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये पाय अडकडलेला दिसत आहे. या अडकलेल्या प्रवाशाला वाचवण्यासाठी एका आरपीएफच्या जवानांनी धाव घेतली आणि त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. एएनआय या वृत्तसंस्थने हा व्हिडिओ शेअर केला आहे. २९ ऑगस्टला ही घटना घडली आहे.

- Advertisement -

नामपल्ली या रेल्वे स्थानकावरील ही घटना आहे. या घटनेच्या दरम्यान स्टेशनवर जास्त लोक नव्हते. आरपीएफच्या जवानांने त्या प्रवासी व्यक्तीचे प्राण वाचवल्यामुळे तो गंभीर जखमी झाला नाही आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -