घरदेश-विदेशTelangana Revanth Reddy: रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री! 'या' दिवशी होणार भव्य...

Telangana Revanth Reddy: रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री! ‘या’ दिवशी होणार भव्य शपथविधी

Subscribe

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर काँग्रेसने आता आपल्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला आहे. रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. सुरुवातीला काही नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता. परंतु हाय कमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

नवी दिल्ली: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर काँग्रेसने आता आपल्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला आहे. रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. सुरुवातीला काही नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता. परंतु हाय कमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. (Telangana Revanth Reddy Revanth Reddy is the new Chief Minister of Telangana Grand swearing in ceremony will be held on 7 december )

या दिवशी शपथविधी

रेड्डी 7 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत काही मंत्रीही शपथ घेणार आहेत. हैदराबादमध्ये सीएलपीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांचे नाव आता अनोळखी राहिलेले नाही. रविवारी, जवळजवळ ‘अशक्य’ आणि ‘अजिंक्य’ वाटणारा विजय रेड्डी यांनी खेचून आणला. भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख के. चंद्रशेखर राव (KCR) यांचं सरकार पडलं. ‘अशक्य शक्य’ करण्याचे श्रेय यावेळी तेलंगणात रेवंत रेड्डी वगळता कोणालाही देता येणार नाही.

कोण आहेत रेवंत रेड्डी?

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यास प्रेरित करण्याचे श्रेय देणारे रेवंत रेड्डी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1969 रोजी महबूबनगर जिल्ह्यातील कोंडारेड्डी पल्ली येथे झाला. विद्यार्थी जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) चे सदस्य असलेले रेवंत यांनी 2006 मध्ये स्थानिक राजकारणात प्रवेश केला आणि प्रथमच ते अपक्ष म्हणून मिडजिल मंडळातून ZPTC सदस्य म्हणून निवडून आले. पुढच्याच वर्षी म्हणजे 2007 मध्ये ते पहिल्यांदाच अपक्ष म्हणून विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आले.

- Advertisement -

टीडीपी नेता म्हणून कधीही निवडणूक हरले नाही

उस्मानिया विद्यापीठाचे ए.व्ही. कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवलेल्या रेवंत रेड्डी यांनी नंतर तेलुगु देसम पार्टी (TDP) प्रमुख (आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री) एन. चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतल्यानंतर टीडीपीमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये, त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि पाच वेळा काँग्रेसचे आमदार गुरुनाथ रेड्डी यांचा TDP उमेदवार म्हणून पराभव केला. यानंतर, 2014 मध्ये, त्यांनी पुन्हा एकदा अविभाजित आंध्र प्रदेशातील तेलंगणा विधानसभेसाठी कोडंगल जागेवरून टीडीपी उमेदवार गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला आणि त्यानंतर ते टीडीपीच्यावतीने सभागृहाचे नेते म्हणून निवडले गेले.

काँग्रेसचे दिग्गज नेते जयपाल रेड्डी यांचा जावई (रेवंतचे लग्न गीता, जयपाल रेड्डी यांची भाची), रेवंत रेड्डी यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मलकाजगिरी संसदीय जागेवरून काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे करण्यात आले आणि त्यांनी TRS उमेदवार मारी राजशेखर रेड्डी यांचा पराभव केला.

(हेही वाचा: Telangana : काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार माणिकराव ठाकरेंना मिळणार मोठी जबाबदारी? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -