घरदेश-विदेशमुंबईसह देशातील प्रमुख शहरांच्या रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी

मुंबईसह देशातील प्रमुख शहरांच्या रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी

Subscribe

देशातील मोठ्या आणि खुप वर्दळीच्या रेल्वे स्थानकांना तसेच मंदिरांवर हल्ला घडवून आणण्याच्या प्रयत्नात जैश-ए-मोहम्मदचे ही दहशतवादी संघटना असल्याचे समजते. हरियाणा येथील रोहतक रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्याला दोन दिवसांपूर्वी अशा आशयाचे धमकीचे पत्र मिळाले आहे. पाकिस्तानमधील जैशच्या दहशतवाद्यांनी हे धमकीचे पत्र पाठवले असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. या पत्रात रोहतक, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू रेल्वे स्थानकांसह अन्य ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याबाब माहिती देण्यात आली असून त्यानंतर रेल्वे प्रशासनाने देशातील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढवली आहे.

यापूर्वी गेल्या महिन्यात बकरी ईद आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशात दहशतवाद्यांकडून घातपात घडवण्याचा कट असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, दिल्लीसह १५ शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले होते. तसेच देशभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत नवरात्रौत्सवाला सुरुवात होत असून दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

काश्मीरमधील परिस्थितीचा अहवाल सादर करा – सुप्रीम कोर्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -