घरताज्या घडामोडीमणिपुरमध्ये असम राइफल्सवर दहशतवाद्यांचा आयडी हल्ला, कर्नलसह पत्नी, मुलाचा मृत्यू, ३ जवान...

मणिपुरमध्ये असम राइफल्सवर दहशतवाद्यांचा आयडी हल्ला, कर्नलसह पत्नी, मुलाचा मृत्यू, ३ जवान शहीद

Subscribe

हल्ल्यामागे मणिपुरची चरमपंथी संगठना पीपुल्स लिबरेशन आर्मीचा हात असल्याचे म्हटले जात आहे

मणिपुरमध्ये भारतीय सैन्याच्या एका तुकडीवर आंतकवादी हल्ल्याची माहिती समोर येत आहे. आंतकवाद्यांनी केलेल्या या आत्मघाती हल्ल्यात ४६ असम राइफल्सचे कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्यासह चार जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात कर्नर विप्लव यांची पत्नी आणि मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. या वर्षात झालेल्या आत्मघाती हल्ल्यातील हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मणिपुरच्या चुराचांदपुर जिल्ह्यातील सिंगनगाटच्या सेहकेन गावात हा आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडर त्यांच्या कुटुंबातील २ जण, तसेच एक्शन टीमच्या तीन जवानांनाचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे मणिपुरची चरमपंथी संगठना पीपुल्स लिबरेशन आर्मीचा हात असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

सेहकेन जिल्हा मुख्यालय चुराचंदपुरपासून ६५ किलोमीटर लांब असलेल्या बेहियांग क्षेत्रातील एक सीमावर्ती गाव आहे. आतंकवादी हल्ल्याची कारवाई करण्यासाठी सिक्रेट ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. ज्या वेळेस असम राइफल्स यूनिटचे कमांडर राहत होते त्या परिसरात हल्ला केला त्या वेळीस सैन्याच्या टीममधील काही सदस्य आणि कमांडर ऑफिसरचे कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित होते.

या आत्मघाती हल्ल्यानंतर मणिपुरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी ट्विट करत या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. यात सीओ आणि त्यांच्या परिवारासह काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. राज्यदल आणि निमलष्करी दलाचे आतंकवाद्यांच्या विरोधात पहिल्यापासून सिक्रेट ऑपरेशन सुरू आहे. या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

 

हा आत्मघाती हल्ल्याला पीपुल्स लिबरेशन आर्मी जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. ही संगठना १९७८मध्ये सुरू झाली. बिसश्वेर सिंह यांनी ही संघटना स्थापन केली होती. भारत सरकारने ही संघटना आतंकवादी संघटना म्हणून घोषित केली. आतंकवाद्यांची ही संघटना मणिपुरमध्ये असलेल्या भारतीय सुरक्षा दलांवर आत्मघाती हल्ले करण्यात प्रामुख्याने सक्रिय असते. ही संघटना स्वतंत्र मणिपूरची मागणी करत आहे.


हेही वाचा – लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या ८३ आरोपींना पंजाब सरकारचे बक्षीस जाहीर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -