घरक्राइम'त्याने' साईबाबा आणि भक्तालाही नाही सोडले; देणगीत 'झोल' करणाऱ्यावर गुन्हा दाखल

‘त्याने’ साईबाबा आणि भक्तालाही नाही सोडले; देणगीत ‘झोल’ करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Subscribe

साईबाबा संस्थानमध्ये कोट्यवधीचे दान दिले जाते. देणगी कोट्यवधीच्या घरात प्राप्त होत असल्याने काहीजण अपहारही करतात. असाच काहीसा प्रकार साईबाबा संस्थानमध्ये घडत असल्याची माहिती संस्थानला एक निनावी पत्रातून मिळाली होती

शिर्डी : सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थानला हजारो भाविक भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतात. यावेळी कबुल केलेला नवसही अनेकजण येथेच फेडतात. यावेळी साई भक्तांकडून कोट्यवधीचे दानही करतात. हेच हेरून साईबाबा संस्थानमधील एका कंत्राटी कर्मचाऱ्याने बनावट देणगी पावती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, साईबाबा संस्थानमध्ये असे घडल्याने शिर्डीसह राज्यात खळबळ उडाली आहे. (He did not spare Saibaba and the devotee either A case has been registered against the person who made the donation song Zhol)

साईबाबा संस्थानला प्राप्त झाले होते निनावी पत्र

साईबाबा संस्थानमध्ये कोट्यवधीचे दान दिले जाते. देणगी कोट्यवधीच्या घरात प्राप्त होत असल्याने काहीजण अपहारही करतात. असाच काहीसा प्रकार साईबाबा संस्थानमध्ये घडत असल्याची माहिती संस्थानला एक निनावी पत्रातून मिळाली होती. त्या पत्रात नमूद होते की, देणगी कक्षात कामावर असलेला एक कंत्राटी कर्मचारी देणगीदारांना निम्म्या रकमेची बनावट पावती देतोय. या तक्रारीनंतर साईबाबा संस्थांनने चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

- Advertisement -

हेही वाचा : PUNE CRIME : रुग्णालयात बसून तो चालवत होता ड्रग्जचे रॅकेट; मात्र CRIME BRANCH ने उधळला डाव

शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संस्थानचे प्रभारी लेखा अधिकारी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, देणगी कक्षात कंत्राटी कामावर असलेल्या दशरथ चासकर या कर्मचाऱ्याने अपहार केल्याचे समोर आले. याप्रकारानंतर साईबाबा संस्थानचे प्रभारी लेखा अधिकारी कैलास खराडे यांच्या फिर्यादीवरून कंत्राटी कर्मचारी दशरथ चासकर याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे रस्त्यावरील खड्डे तरी बुजवले जातील; शरद पवारांचा भाजपला टोला

फसवणुकीचे रॅकेट असण्याची शक्यता

साईबाबांच्या झोळीत साईभक्त श्रद्धेने दान करतात. त्यामुळे साईभक्त व साईबाबा संस्थानची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता पुढे येत आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपीला अजून कोणाची साथ असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याचबरोबर आत्तापर्यंत किती लोकांना अशा पद्धतीने बनावट पावत्या देण्यात आला याचा तपास सुद्धा आता पोलीस करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -