घरदेश-विदेशअमर जवान ज्योतीला युद्धस्मारकावर नेण्याचा भावनिक क्षण, अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले; मोदींची...

अमर जवान ज्योतीला युद्धस्मारकावर नेण्याचा भावनिक क्षण, अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले; मोदींची ‘मन की बात’

Subscribe

इंडिया गेटजवळील 'अमर जवान ज्योती' आणि जवळच असलेल्या 'नॅशनल वॉर मेमोरिअल' येथे प्रज्वलित केलेली ज्योती एकत्र असल्याचे आपण पाहिले. या भावनिक प्रसंगी अनेक देशवासीयांच्या आणि शहीद कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू तरळले, असं त्यांनी सांगितलं.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (30 जानेवारी) मन की बातच्या 85 व्या भागाला संबोधित केलंय. आजचा मन की बात कार्यक्रम हा या वर्षातील पहिला भाग आहे. पंतप्रधान मोदींनी आज देशवासीयांशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केलीय. आज मन की बातमध्ये केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी आज दिल्लीतील बापूंच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

2022 मधील ही पहिली ‘मन की बात’ असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. आज आपण अशा चर्चा पुन्हा पुढे नेऊ, ज्याचा संबंध आपल्या देश आणि देशवासीयांच्या सकारात्मक प्रेरणा आणि सामूहिक प्रयत्नांशी आहे. आज आपले पूज्य बापू महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. 30 जानेवारी हा दिवस आपल्याला बापूंच्या शिकवणुकीची आठवण करून देतो, असंही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आपणही प्रजासत्ताक दिन साजरा केला. देशाच्या पराक्रमाची आणि सामर्थ्याची झांकी, जी आपण दिल्लीतील राजपथावर पाहिली, त्याने सर्वांच्या मनात अभिमान आणि उत्साह भरून आला. एक बदल जो तुम्ही पाहिलाच असेल, आता प्रजासत्ताक दिनाचा उत्सव 23 जानेवारीपासून म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून सुरू होईल आणि 30 जानेवारीपर्यंत म्हणजेच महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपर्यंत सुरू राहील, असंही ते म्हणाले.

इंडिया गेटवर नेताजींचा डिजिटल पुतळाही बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देशाने ज्या पद्धतीने याचे स्वागत केले, देशाच्या कानाकोपऱ्यातून उसळलेली आनंदाची लाट, प्रत्येक देशवासीयाने व्यक्त केलेल्या भावना आपण कधीही विसरू शकत नाही. इंडिया गेटजवळील ‘अमर जवान ज्योती’ आणि जवळच असलेल्या ‘नॅशनल वॉर मेमोरिअल’ येथे प्रज्वलित केलेली ज्योती एकत्र असल्याचे आपण पाहिले. या भावनिक प्रसंगी अनेक देशवासीयांच्या आणि शहीद कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू तरळले, असं त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

‘अमर जवान ज्योती’प्रमाणेच आमचे शहीद, त्यांची प्रेरणा आणि त्यांचे योगदानही अमर आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणालेत. मी तुम्हा सर्वांना सांगेन की, जेव्हाही तुम्हाला संधी मिळेल तेव्हा ‘नॅशनल वॉर मेमोरियल’ला नक्की भेट द्या. अमृत ​​महोत्सवाच्या या कार्यक्रमांमध्येच देशातील अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आले. एक म्हणजे पंतप्रधानांचा राष्ट्रीय बाल पुरस्कार. लहान वयात धाडसी आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या मुलांना हे पुरस्कार देण्यात आले. आपण सर्वांनी आपल्या घरातील या मुलांबद्दल सांगितले पाहिजे. यातून आपल्या मुलांनाही प्रेरणा मिळेल आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण होईल, असंही नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात पद्म पुरस्कारही जाहीर झालाय. पद्म पुरस्कार मिळविणाऱ्यांमध्ये अशी अनेक नावे आहेत, ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हे आपल्या देशाचे अनसंग हिरो आहेत, ज्यांनी सामान्य परिस्थितीत असामान्य गोष्टी केल्यात. उदाहरणार्थ, उत्तराखंडच्या बसंती देवी यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेय. बसंती देवी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात व्यतीत केले. ते म्हणाले की, चेन्नईच्या मोहम्मद इब्राहिमला 2047 मध्ये भारताला संरक्षण क्षेत्रात मोठी शक्ती म्हणून पाहायचे आहे. चंद्रावर भारताचा स्वतःचा संशोधन केंद्र असावा आणि मंगळावर मानवी लोकसंख्या बसवण्याचे काम भारताने सुरू करावे, अशी त्यांची इच्छा आहे, असंही ते म्हणालेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भिकाजी कामा या स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात धाडसी महिलांपैकी एक होत्या. 1907 मध्ये त्यांनी जर्मनीत तिरंगा फडकावला. हा तिरंगा तयार करण्यासाठी ज्या व्यक्तीने त्यांना साथ दिली ते म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा. कदाचित मी हे काम करावे अशी देवाची इच्छा असेल आणि मलाही या कामाचे भाग्य लाभले. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना 2003 मध्ये त्यांच्या अस्थी भारतात आणल्या होत्या. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या स्मरणार्थ कच्छमधील मांडवी या त्यांच्या जन्मस्थानी एक स्मारकही बांधण्यात आले आहे, असंही त्यांनी सांगितलं.


हेही वाचाः Jammu Kashmir : गेल्या 12 तासात सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा; जैशच्या कमांडरचाही समावेश

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -