घरदेश-विदेशनादच खुळा! 'या' फॅन्सी नंबरसाठी मोजले १० लाख रुपये

नादच खुळा! ‘या’ फॅन्सी नंबरसाठी मोजले १० लाख रुपये

Subscribe

लोकांचं गाड्यांच्या फॅन्सी नंबरसाठीचं वेड कोरोनाच्या काळात देखील कमी झालेलं नाही आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये गाड्यांची विक्री कमी झाली आहे. मात्र, कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटात देखील ‘०००९’ या फॅन्सी नंबरसाठी तब्बल १०.१ लाख रुपयांची बोली लागली. कोरोनाच्या संकटातील सर्वात मोठी बोली आहे. याआधी ‘०००३’ आणि ‘०००७’ नंबरसाठी प्रत्येकी ३.१ लाख रुपयांची बोली लागली होती.

फॅन्सी नंबरच्या ई-निलामीवरून दिल्लीच्या वाहतूक विभागाने ऑगस्टमध्ये ३३.३ आणि जुलैमध्ये ३३.८ लाख रुपयांची कमाई केली. फॅन्सी नंबर रजिस्ट्रेशनची ई-निलामी मार्चमध्ये बंद करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा सुरू करण्यात आली. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात वाहतूक विभागाने फॅन्सी नंबर्सच्या ई-निलामीवरून ९९.६ लाख रुपयांची कमाई केली. मागील वर्षी या काळात तब्बल ४.६ कोटी रुपयांची कमाई केली होती. दरम्यान, दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी हे चांगले संकेत असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

२०१७ मध्ये बनला होता विक्रम

जून २०१७ मध्ये एका संस्थेने रेकॉर्ड बनवला होता, जो अद्याप मोडला गेलेला नाही. संस्थेने ‘०००१’ या फॅन्सी नंबरसाठी तब्बल १६ लाख रुपये मोजले होते. याआधी या नंबरसाठी १२.५ लाख रुपये मोजले गेले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -