घरदेश-विदेशमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी लाइव्ह पाहता येणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी लाइव्ह पाहता येणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Subscribe

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पदभार स्विकारल्यापासून अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. आज त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर असलेल्या खटल्यांची सुनावणी आता लाइव्ह करण्यात येणार आहे.  २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून सुरुवातीला युट्यूबवर लाइव्ह टेलिकास्ट होणार आहे. नंतर, लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येणार आहे.

हेही वाचा – शैक्षणिक संस्थांमध्ये ड्रेसकोड लागू करण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

- Advertisement -

आज झालेल्या फूल कोर्ट मीटिंगमध्ये उदय लळीत यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बार अॅण्ड बेंचने याबाबत वृत्त दिलंय. माजी सरन्यायाधीस एन.व्ही रमणा यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम लाईव्ह केला होता. नॅशनल इन्फॉर्मेटिंक्स सेंटर या संकेतस्थळावरून हे लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यात आलं होतं.

१३ दिवसांत पाच हजार प्रकरणं निकाली

- Advertisement -

उदय लळीत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पद स्विकारल्यापासून अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांनी अवघ्या १३ दिवसांत पाच हजारांपेक्षा जास्त प्रकरणं निकाली काढली आहेत. आतापर्यंत ५११३ प्रकरणं निकाली काढली असून यामध्ये २८३ नियमित, १२१२ हस्तांतरण केलेल्या आणि ३६१८ अन्य प्रकरणांचा समावेश आहे.

हेही वाचा – शैक्षणिक संस्थांना युनिफॉर्म निश्चित करण्याचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवीन प्रणाली लागू

प्रकरणं निकाली काढण्यासाठी उदय लळीत यांनी नवीन प्रणाली लागू केली आहे. तसंच, कामाच्या दिवशी नियमित प्रकरणाच्या सुनावणी सकाळी १०.३० ते दुपारी १ दरम्यान होत आहेत. तर, इतर प्रकरणांच्या सुनावणी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत घेण्यात येत आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीही लाईव्ह पाहता येणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -