घरताज्या घडामोडीउद्यापासून नवीन आर्थिक वर्षाला होणार सुरुवात, जाणून घ्या काय होणार स्वस्त आणि महाग?

उद्यापासून नवीन आर्थिक वर्षाला होणार सुरुवात, जाणून घ्या काय होणार स्वस्त आणि महाग?

Subscribe

नवीन आर्थिक वर्षाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. परंतु या नव्या आर्थिक वर्षात काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. परंतु याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेले नवीन कर आणि तरतुदी उद्यापासून लागू होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

उद्यापासून नवीन कर प्रणाली लागू होणार आहे. तसेच नवी कर प्रणाली निवडणाऱ्यांना रिबेटसाठीची ७ लाखांची मर्यादा असणार आहे. याआधी ५ लाख इतकी मर्यादा होती. अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला दिलासा देण्यात आला आहे. त्यानुसार नव्या कर प्रणालीत ५० हजार रुपयांचा स्टँडर्ड डिडक्शनदेखील असणर आहे.

- Advertisement -

काय स्वस्त होणार?

मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वाहने, टेलिव्हिजन संच, बॅटरी, कॅमेरा लेन्स, कॅमेरा

- Advertisement -

काय महाग होणार?

चांदी, पितळ, सिगारेट, सोने, प्लॅटिनम, आयात केलेले दरवाजे, खेळणी, सायकल, इलेक्ट्रिक किचन चिमणी या वस्तू महाग होणार आहेत.

एक एप्रिलपासून BS6 च्या फेस-2 एमिशन नॉर्म्स लागू होणार आहे. तसेच BS6-II कारची विक्री होणार आहे. त्यामुळे मारुती, होंडा, हुंडाई, टाटासह अनेक कंपन्यांनी वाहनाचे दर वाढवण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने आपल्या कमर्शियल वाहनांच्या किंमतीत ५ टक्क्यांची वाढ केली आहे.

१ एप्रिलपासून अत्यावश्यक औषधं महागणार

एकीकडे केंद्र सरकारने देशाबाहेरून येणाऱ्या औषधांवरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला असून दुसरीकडे अत्यावश्यक औषधं महागणार येत्या १ एप्रिलपासून महागणार आहेत. या औषधांच्या यादीत पेनकिलर्स, अँटी इन्फेक्टीव्ह, हृदयरोगावरील गोळ्या, अँटी बायोटीक्सचा समावेश आहे. सरकारने औषध कंपन्यांना दरवाढीची परवानगी दिली आहे. तसेच ही दरवाढ १२ टक्क्यांहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.

रस्त्यावरील प्रदूषण आणि अपघात रोखण्यासाठी जुन्या वाहनांना रोखण्यासाठी सरकारकडून स्क्रॅपिंग पॉलिसी लागू होणार आहे. स्क्रॅपिंग धोरणानुसार, १० वर्षांपेक्षा जुनी व्यावसायिक वाहने आणि १५ वर्षांपेक्षा जुनी खाजगी प्रवासी वाहनांना प्रदूषण आणि फिटनेस चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे सोने आणि चांदीच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : खूशखबर! १ एप्रिलपासून ‘ही’ औषधं होणार स्वस्त, केंद्र सरकारचा मोठा निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -