घरदेश-विदेश१० वर्षानंतर संजय दत्त 'सायकल' चालवणार; गाझियादबादमधून निवडणूक लढणार

१० वर्षानंतर संजय दत्त ‘सायकल’ चालवणार; गाझियादबादमधून निवडणूक लढणार

Subscribe

२००९ मध्ये संजय दत्त यांनी लखनऊमधून सपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द केली होती.

बॉलिवूडचा सुपरस्टार आणि समाजवादी पार्टीचे माजी महासचिव संजय दत्त पुन्हा एकदा सायकलवर बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त आगामी लोकसभा निवडणुकिच्या रिंगणात उतरणार आहे. उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमधून ते निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. संजय दत यांनी काही वर्षापूर्वीच सपामध्ये प्रवेश केला होता. संजय दत्त यांची बहिण प्रिया दत्त काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे.

२००९ मध्ये सपामध्ये प्रवेश

अभिनेता संजय दत्त उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. संजय दत्त यांनी २००९ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. राज्यसभा खासदार अमर सिंह यांच्या आग्रहामुळे संजय यांनी ‘सपा’मध्ये प्रवेश केला होता. दरम्यान ‘सपा’मधून अमरसिंह बाहेर झाल्यानंतर संजय दत्त यांनी देखील पक्षापासून स्वत:ला वेगळे केले होते. आता पुन्हा एकदा संजय दत्त निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त आले आहे. सपा त्यांना गाझियाबादमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

गाझियाबादमध्ये संजय दत्त यांच्या नावाची चर्चा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता संजय दत्त समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आधी २००९ मध्ये संजय दत्त यांनी लखनऊमधून सपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द केली होती. त्यावेळी खासदार अमर सिंह अमर सिंह यांनी संजय दत्त यांना घेऊन सपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी संजय दत्त यांना सपाचे महासचिव बनवले गेले होते. यावेळी चर्चा आहे की, समाजवादी पक्ष एखाद्या कलाकाराला गाझियाबादमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरवणार असून संजय दत्त यांच्या नावाची चर्चा आहे.

‘जिला गाजियाबाद’ चित्रपटात केले होते काम

५९ वर्षाचे संजय दत्त यांचा गाझियाबादशी तसे काहीच राजकीय संबंध नाहीत. मात्र २०१३ मध्ये त्यांनी ‘जिला गाजियाबाद’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात गाझियाबादमध्ये होणाऱ्या गुंडगिरी दाखवण्यात आली आहे. संजय दत्त निवडणुकीच्या रिंगणारत उतरले तर, वडील सुनिल दत्त, आई नरगिस आणि बहिण प्रिया दत्तनंतर ते दत्त कुटुंबातील चौथे सदस्य असतील जे राजकारणात एन्ट्री घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -