घरदेश-विदेशवायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात ३ 'गांधी' निवडणूक रिंगणात

वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात ३ ‘गांधी’ निवडणूक रिंगणात

Subscribe

राहुल गांधी यांच्या समोर उभे राहिलेले तीन उम्मेदवारांची नावं के ई राहुल गांधी, के राहुल गांधी आणि के एस शिवप्रसाद गांधी अशी आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यावेळी लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदार संघ आणि केरळच्या वायनाड लोकसभा मदतार संघातून लढणार आहेत. दरम्यान, वायनाड लोकसभा मतदार संघात राहुल गांधींच्या विरोधघात तीन ‘गांधी’ निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. यामधील एका उमेदवाराचे नाव चक्क राहुल गांधीच आहे. वायनाडच्या जागेसोबतच केरळच्या सर्व २० जागांवर २३ एप्रिलला मतदान होणार आहे.

हे आहेत ते तीन ‘गांधी’ 

दरम्यान, वायनाड लोकसभा मतदार संघाच्या जागेवर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल आहे. राहुल गांधी यांच्या समोर उभे राहिलेले तीन उम्मेदवारांची नावं के ई राहुल गांधी, के राहुल गांधी आणि के एस शिवप्रसाद गांधी अशी आहेत. यामधील ३३ वर्षाचे के ई राहुल गांधी कोट्टायम के निवसी आहे. तर अगीला इंडिया मक्कल कझगम पार्टीचे उमेदवार राहुल गांधी कोयंबटूर येथे राहणारे आहेत. तर के एस शिवप्रसाद गांधी त्रिशूर येथे राहणारे आहेत. एकाच आडनावाचे तीन उमेदवार निवडणुकिच्या रिंगणात उतरल्यामुळे राहुल गांधी यांना काहीसा फटका बसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

उमेदवाराकडे संपत्ता काहीच नाही

चुनाव आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, के ई राहुल गांधी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि त्यांनी एम फिलची डिग्री घेतली आहे. तर त्यांच्याकडे फक्त ५००० रुपये हातात आणि ५१५ रुपये बँक खात्यात आहे. तर के राहुल गांधी हे रिपोर्टर आहेत आणि त्यांची पत्नी डेंटल टेक्निशन आहे. के एम शिवसप्रसाद गांधी संस्कृतचे शिक्षक आहेत आणि त्यांची पत्नी कम्प्युटर ऑपरेटर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -