घरदेश-विदेशअमेरिकेच्या टाइम मॅगझिनकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेस्की यांना 'पर्सन ऑफ द ईयर'

अमेरिकेच्या टाइम मॅगझिनकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेस्की यांना ‘पर्सन ऑफ द ईयर’

Subscribe

टाईम्स मॅगजीनच्या या पुरस्काराला जागतिक स्तरावर वेगळेच महत्त्व आहे. विशेष म्हणजे १२ महिन्याच्या कालावधीत जागतिक स्तरावर प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेस्की यांची निवड करताना जागतिक स्तरावर घडलेल्या अनेक घटनांचा विचार केला गेला.

अमेरिका: जगप्रसिद्ध टाईम मॅगझिनने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेस्की यांना सन २०२२ चे पर्सन ऑफ द ईयर घोषित केले आहे. बुधवारी मॅगजीनने ही घोषणा केली. या घोषणेमुळे अमेरिकेचा युक्रेन-रशिया युद्धात नेमका कोणाला पाठिंबा आहे याची चर्चा सुरु झाली आहे.

कारण टाईम मॅगझिनच्या या पुरस्काराला जागतिक स्तरावर वेगळेच महत्त्व आहे. विशेष म्हणजे १२ महिन्याच्या कालावधीत जागतीक स्तरावर प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेस्की यांची निवड करताना जागतीक स्तरावर घडलेल्या अनेक घटनांचा विचार केला गेला. इराणमधील आंदोलन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंंग, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क व अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय, आदिंचा विचार या पुरस्कारासाठी केला गेला होता. त्यातून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेस्की यांची निवड करण्यात आली.

- Advertisement -

टाईमचे एडिटर इन चिफ एडवर्ड फेलसेंथल यांनी सांगितले की, युक्रेनचे रशियासोबत सुरु असलेले युद्ध काहींना आशा देणारे आहे तर काहींना भय देणारे आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेस्की यांनी जगाला अशी प्रेरणा दिली आहे की गेल्या दशकात एवढं प्रेरणादायी कोणी नव्हतं. त्यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेस्की यांची निवड स्पष्ट होती.

टाईम मॅगझिनने सांगितले की, रशियासोबत युद्ध सुरु झाले तेव्हा युक्रेनवरचे हल्ले धक्कादायक होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेस्की यांच्या जीवाला धोका होता. तरीही त्यांनी देश सोडला नाही. ते दौरे करत होते. त्यांनी त्यांच्या जनतेला आत्मविश्वास दिला. त्यांनी संसदेत केलेले भाषण तेथील जनतेला प्रेरणा देणारे होते. २४ फेब्रुवारी २०२२ पासून रशियासोबत युक्रेनचे युद्ध सुरु आहे. या दहा महिन्यांच्या काळात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेस्की हे डगमगले नाहीत. या युद्धात दोन्ही देशाचे शेकडो नागरिक मारले गेले.

- Advertisement -

सन २०२१ मध्ये टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांची पर्सन ऑफ द ईयर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यांच्या कंपनीच्या ईलेक्ट्रीक कारला सर्वाधिक पसंती मिळाली होती. १९२७ पासून टाईम मॅगझिन हा पुरस्कार देत आहे.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -