घरदेश-विदेशतिरुपती बालाजी मंदिर झाले प्लास्टिक मुक्त, बायोडिग्रेडेबल बॅगमध्ये मिळणार प्रसाद

तिरुपती बालाजी मंदिर झाले प्लास्टिक मुक्त, बायोडिग्रेडेबल बॅगमध्ये मिळणार प्रसाद

Subscribe

जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तिरुपती बालाजी (tirupati balaji) मंदिर आता प्लास्टिकमुक्त होणार आहे. सर्वात श्रीमंत अशा बालाजी मंदिरात डिफेंस रीसर्च अँन्ड डेवलपमेंट ऑर्गनाइजेशन म्हणजेच DRDO यांने नुकतच तिरूपती मंदिरामध्ये बायोडिग्रेडेबल बॅग (biodegradable bags)लॉंच केली आहे. DRDO अध्यक्षांच्या मते बायोडिग्रेडेबल बॅगची सुरूवात करणे हा एक पर्यावरणपूरक उपाय आहे. तसेच हे मनुष्य जातीच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. आगामी काळात आम्ही भाविकांची प्रतिक्रिया जाणून या उपक्रमाला भाविक कसा प्रतिसाद देत आहेत याची चाचपणी केल्यानंतर आम्ही याची विक्री पूर्ण क्षमतेने सुरू करणारा आहोत. असे वक्तव्य DRDO समितीचे कार्य कार्यकारी अधिकारी डॉ. एस.के रेड्डी यांनी केलं आहे.(tirupati devasthanans drdo launched biodegradable bags)

तिरुमला देवस्थान समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ के.एस.रेड्डी, ऍडिशनल EO ए वी धर्म रेड्डी तसेच DRDO चे अध्यक्ष सतिश रेड्डी यांनी 22 ऑगस्ट रोजी एक विशेष विक्री काऊंटरचे उद्घाटन केले. यानंतर माध्यमांशी संपर्क साधत त्यांनी DRDO चे अध्यक्ष म्हणाले की, पर्यावरणाला लाभदायक अशा बायोडिग्रेडेबल बॅग तयार करण्यासाठी अनेक संशोधन,अभ्यास तसेच प्रयोग करण्यात आले आहेत. इतकंच नाही तर पेट्रोकेमिकल्सपासून तयार होणाऱ्या बॅग, पॉलिथिन बॅग पर्यावरणासाठी हानिकारक व विषारी ठरतात. त्यांना नष्ट व्हायला प्रचंड मोठा कालावधी लागतो. यासाठीच आम्ही सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी करत , आम्ही कॉर्न स्टार्चपासून पर्यावरण पूरक बॅग घेऊन आलो आहोत.

- Advertisement -

हे हि वाचा – लस घेऊनही वाढतोय कोरोनाच्या ‘ब्रेकथ्रू इंफोक्शन’चा धोका, प्रभावी लसीचा शोध सुरु

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -