घरताज्या घडामोडीCoronavirus: दिलासादायक! देशातील आठवड्याभरातील कोरोना केसेसमध्ये १३.६ टक्कांनी घसरण

Coronavirus: दिलासादायक! देशातील आठवड्याभरातील कोरोना केसेसमध्ये १३.६ टक्कांनी घसरण

Subscribe

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. मागील २ महिन्यात सर्वात वेगाने कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या आठवड्याभरातील केसेसमध्ये १३.६ टक्क्यांची घसरण झाली आहे. देशात १६ ते २२ ऑगस्ट दरम्यान २.२ लाख कोरोना केसेसची नोंद झाली, जी मागील आठवड्यातील २ लाख ५५ हजार ८१९ पेक्षा कमी आहे. २८ जून ते जुलै दरम्यानच्या ४ आठवड्यानंतर आठवड्याभरातील केसेसमध्ये पहिल्यांदाच दोन अंकी घसरण झाली आहे. त्यावेळी साप्तहिक केसेसमध्ये ११.४ टक्क्यांची घसरण झाली होती.

देशात १६ ते २२ ऑगस्टदरम्यान महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि ओडिसामधील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट झाली आहे. मात्र केरळमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. रविवारी केरळमध्ये १० हजार ४०२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आणि ६६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर २५ हजार ५८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. केरळमधील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३८ लाख १४ हजार ३०५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १९ हजार ४९४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३६ लाख ३१ हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या केरळमध्ये १ लाख ६३ हजार २३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील ईशान्यकडील राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या दोन आठवड्यात होणारी संसर्गाची वाढ गेल्या सात दिवसांत कमी होऊ लागली आहे.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासांत २५ हजार ७२ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३८९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४४ हजार १५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील आता कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी २४ लाख ४९ हजार ३०६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ३४ हजार ७५६ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी १६ लाख ८० हजार ६२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ३ लाख ३३ हजार ९२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – देशात पुढच्या महिन्यात येणार तिसरी कोरोना लाट, दुसऱ्या लाटेपेक्षाही धोकादायक – नीती आयोग

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -