घरदेश-विदेशरेल्वे प्रवाशांची चिधींगिरी; टॉयलेटमधले नळ चोरले

रेल्वे प्रवाशांची चिधींगिरी; टॉयलेटमधले नळ चोरले

Subscribe

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने नवनवीन प्रयोग केले जात असतात. मात्र या अत्याधुनिक सुविधांचा प्रवासी विचका पाडतात. पंजाब मेलमध्ये अपेक्षेप्रमाणे नळ आणि पाण्याचा लोटा चोरण्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने नाराजी व्यक्त केली आहे.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने नवनवीन प्रयोग केले जात असतात. याच प्रयोगाचा भाग म्हणून मध्य रेल्वेने अलिकडे पंजाब मेलमधील प्रसाधनगृहात कमोड आणि मोठ्या फ्लश टाकीची सुविधा केली होती. पण, एका आठवड्याच्या आतच प्रवाशांनी विनावातानुकूलित डब्यातील या सुविधांची वाट लावून टाकली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे अधिकारी विचारात पडले आहेत.

पंजाब मेलमध्ये नळाची चोरी

पंजाब मेलमध्ये प्रसाधन गृहात अधिक स्वच्छता राखण्यासाठी विनावातानुकूलित डब्यात नवीन टाईल्स, कमोड आणि मोठी फ्लश टाकी बसवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. या प्रयोगाच्या यशानंतर इतरही गाड्यांमध्ये हा प्रयोग करण्यात येणार होता. मात्र पहिल्या दोन महिन्यात अपेक्षेप्रमाणे नळ आणि पाण्याचा लोटा चोरण्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

तेजस एक्स्प्रेसचे हेडफोन  देखील चोरीला गेले

गेल्या आठवड्यात टॉयलेटचे कमोड तोडून ठेवण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या डब्यातील टॉयलेटचे भांडे तोडण्यात आले. तर गेल्या वेळेस तेजस एक्स्प्रेसमधील हेडफोन देखील चोरीला गेले होते. अत्याधुनिक सुविधा असणार्‍या महामाना एक्स्प्रेसमध्येही आलिशान आसन व्यवस्था प्रवाशांकडून खराब करण्यात आली होती. रेल्वेची संपत्ती ही सार्वजनिक संपत्ती असून देशाची संपत्ती आहे, तिचा अशाप्रकारे गैरवापर करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. तरीही प्रवासी अशा प्रकारचे कृत्य करतात, त्यामुळे मध्य रेल्वेने नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -