घरदेश-विदेशदिल्ली ते लंडन प्रवास; व्हाया बस ट्रीप

दिल्ली ते लंडन प्रवास; व्हाया बस ट्रीप

Subscribe

परदेशात जाण्यासाठी केवळ विमान प्रवासच करता येतो, हे आतापर्यंत आपल्याला माहिती होते. मात्र आता बाय रोडदेखील परदेशात जाता येणार आहे. भारतातून थेट लंडनला रस्त्याच्या मार्गे प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. हा प्रवास बसने करता येणार आहे. दिल्लीच्या गुरगावमधील खासगी प्रवास कंपनीने १५ ऑगस्टला बस टू लंडन या नावाची बससेवा सुरू केली आहे. या बसने ७० दिवसांमध्ये तुम्ही दिल्लीवरून लंडनला पोहोचू शकणार आहात. ही सेवा पुढील वर्षीच्या मे महिन्यात सुरू होणार आहे.

या देशातून जाणार बस 

दिल्ली ते लंडन हा प्रवास ७० दिवसांचा असणार आहे. या प्रवासात १८ अन्य देशांची सफरदेखील घडणार आहे. भारतातून सुरू होणारा हा प्रवास म्यानमार, थायलँड, लाओस, चीन, किर्गिजस्तान, उजबेकिस्तान, कजाकिस्तान, रशिया, लातविया, लिथुआनिया, पोलंड, चेक रिपब्लिक, जर्मनी नेदरलँड, बेल्जिअम, फ्रान्समधून युकेमध्ये पोहोचले. दिल्लीचे रहिवासी अससेले तुषार आणि संजय मदान हे याआधीही रस्त्यामार्गे दिल्लीहून लंडनला गेले आहेत. या दोघांनी २०१७, २०१८ आणि २०१९ सारी कारने हा प्रवास केला होता.

- Advertisement -

मोजावे लाख १५ लाख रूपये 

यंदा २० जणांना सोबत घेऊन बसने प्रवास करण्याचा त्यांचा मानस आहे. बस टू लंडनचा प्रवास ४ भागांमध्ये विभागण्यात आला आहे. प्रवाशांकडे वेळ कमी असेल आणि त्यांना लंडनपर्यंतचा प्रवास करता येत नसेल, तर ते ठराविक देशही फिरू शकतात. यासाठी प्रवाशांना वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे पैसे द्यावे लागणार आहेत. दिल्लीपासून लंडनपर्यंतचा प्रवास करण्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी ईएमआयचा पर्यायही देण्यात आला आहे.

हेही वाचा –

Video: सायकल घेण्यास कुटुंबीयांनी नाकारले, म्हणून ८वीच्या मुलानं केला इंडियन जुगाड!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -