घरताज्या घडामोडीकन्हैय्या कुमारविरोधात चालणार देशद्रोहाचा खटला

कन्हैय्या कुमारविरोधात चालणार देशद्रोहाचा खटला

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांना याबाबतची मंजुरी दिली आहे. कन्हैय्या कुमारच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि सीपीआय (CPI) चा नेता कन्हैया कुमार याच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांना याबाबतची मंजुरी दिली आहे. यामुळे कन्हैय्या कुमारच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

- Advertisement -

दरम्यान, हा खटला दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात कथित देशविरोधी नारे दिल्याप्रकरणी कन्हैय्या कुमार आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांविरोधात चालणार आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला संमती देणारी फाईल ही गेल्या काही दिवसांपासून पडून होती. मात्र, केजरीवाल सरकारने आता यावर निर्णय घेतला आहे.

प्रकरण काय आहे नेमकं?

२०१६ च्या फेब्रुवारी महिन्यात जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या परिसरात देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांचे व्हिडीओ समोर आले होते. या प्रकरणी जेएनयूच्या विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाची फाईल गेल्या काही महिन्यांपासून धुळ खात होती. दरम्यान, आता केजरीवाल सरकारने कन्हैय्या कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास संमती दिली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -