घरदेश-विदेशUS Election 2020: डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा, टेक्सासमध्ये मिळवला विजय

US Election 2020: डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा, टेक्सासमध्ये मिळवला विजय

Subscribe

रिपब्लिकनचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा जिंकणार की डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडन बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

अमेरिकेत नव्या राष्ट्रपतीपदासाठी US Elections 2020 मतदान सुरु आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११.३० वाजता मतदान प्रक्रिया थांबली तर हे मतदान झाल्यानंतर लगेच मतगणना सुरु झाली. या अटीतटीच्या स्पर्धेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील महत्वाचे असलेले फ्लोरिडा, टेक्सास या राज्यांमध्ये बाजी मारली आहे. दरम्यान राष्ट्राध्यक्षपद कायम राखण्यासाठी ट्रम्प यांना फ्लोरिडामध्ये विजय मिळवणं अत्यंत आवश्यक होता. फ्लोरिडामध्ये एकूण २९ इलेक्टोरल वोटस मिळाल्याची माहिती आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मारली बाजी

दरम्यान रिपब्लिकनचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा जिंकणार की डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडन बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अमेरिकेतील सर्व ५० राज्‍यांमध्ये सोबतच निवडणूक पार पडले असून जवळपास २४ कोटी मतदातांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे सांगितले जात आहे. २००० सालापासून राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ज्या उमेदवाराने फ्लोरिडामध्ये विजय मिळवला आहे, त्याने पुढे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. फ्लोरिडाशिवाय कुठल्याही रिपब्लिकन उमेदवार व्हाइट हाऊसची शर्यत जिंकता आलेली नाही. २०१६ मध्ये ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर फ्लोरिडात फक्त एक टक्का मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

- Advertisement -

जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांनी फ्लोरिडामधल्या प्रचारावर विशेष भर दिला होता. यासह ट्रम्प यांनी ओहायो आणि लोवामध्ये सुद्धा विजय मिळवला आहे. सध्या झालेल्या मतदानाच्या मतमोजणीच्या निकालानुसार फ्लोरिडा, टेक्सास ही राज्य जिंकल्यामुळे ट्रम्पयांच्याकडे २१३ इलेक्टोरल वोट्स तर बायडेन यांना २१० मते मिळाली आहेत.


कोण जिंकणार ट्रम्प की बायडेन? अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षावर १ अरब डॉलरचा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -