घरदेश-विदेशआयुष्यात दोनदा मानसिक आजाराने ग्रासलं होतं - मिलिंद देवरा

आयुष्यात दोनदा मानसिक आजाराने ग्रासलं होतं – मिलिंद देवरा

Subscribe

जेव्हा मी खासदार होतो तेव्हा देखील मी मानसिक आजाराने ग्रासलो होतो.

आयुष्यात दोनदा मानसिक आजाराने ग्रस्त होतो असा खुलासा माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केला आहे. एका वृत्त संस्थेशी बोलताना याबाबतचा खुलासा केला आहे. वयाच्या १६-१७ व्या वर्षी मला आत्महत्येसारख्या विचारांचादेखील सामना करावा लागला. तो एक भयानक काळ होता कारण मला कळत नव्हतं की माझं काय चुकलं आहे. यानंतर २००६-०७ मध्ये जेव्हा मी खासदार होतो, तेव्हा मी पुन्हा या समस्येचा सामना केला. ते म्हणाले की जे यशस्वी होतात त्यांना ही समस्या नसते असं म्हणणं चुकीचं आहे. या आजाराशी कोणालाही संघर्ष करावा लागू शकतो. कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा म्हणाले की, मानसिक आजाराशी वय, लिंग, आर्थिक स्थिती आणि सर्व गोष्टींचा संबंध नाही. हा आजार कोणालाही होऊ शकतो, असं मिलिंद देवरा यांनी सांगितलं.

तुम्ही उदास का आहात? हा प्रश्न या आजाराशी झगडणाऱ्या लोकांना प्रिय व्यक्ती, कुटुंब, मित्र आणि सहकार्यांकडून विचारला जातो, असं ते म्हणाले. त्यांनी सांगितलं की जेव्हा माझी राजकीय कारकीर्द यशाच्या शिखरावर होती, त्यावेळीही मी या आजाराने ग्रस्त होतो. मानसिक आजारासाठी यश किंवा अपयश काही फरक पडत नाही, असं त्यांनी सांगितलं. मी या आजारातून बरा झालो कारण मी लढायला शिकलो, असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं. या आजारावर मात करण्यासाठी औषधं आहेत. परंतु आपल्याला अशा लोकांशी बोलावे लागेल जे आपणास समजू शकतात.

- Advertisement -

हेही वाचा – दिल्ली-मेरठ सेमी हाय स्पीड रेल कॉरिडॉरचे कंत्राट चीनी कंपनीला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -