घरदेश-विदेशUnion Budget 2021: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा; विरोधकांचा गदारोळ

Union Budget 2021: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा; विरोधकांचा गदारोळ

Subscribe

शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसाधारण अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर करत असून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात त्यांनी कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांशी संबंधीत अनेक मोठ्या घोषणा केल्या. आमचं सरकार शेतकरी हितासाठी वचनबद्ध असून शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. मात्र, सीतारमण यांनी शेतकऱ्यांचा उल्लेख करताच विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी देखील करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या जाणार आहेत याकडे देशाचं लक्ष लागून होतं. कारण केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेले दोन महिने दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. त्याच धरतीवर अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कोणत्या घोषणा केल्या जाणार याकडे शेतकऱ्यांसह साऱ्या देशाचं लक्ष लागून होतं. दरम्यान, अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी शेतकऱ्यांच्या शेतमाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट असून गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरता तरतूद करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.

- Advertisement -

गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांचा फायदा

२०१२ मध्ये शेतकऱ्यांना किमान हमीभावापोटी ३३ हजार कोटी रुपये दिले होते. २०१५ मध्ये शेतकऱ्यांना ५२ हजार कोटी रुपये दिले. तर २०२०-२१ मध्ये हा आकडा ७५ हजार कोटींनी वाढला. गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांना फायदा झालाय, अशी माहिती सीतारमण यांनी दिली.


हेही वाचा – Union Budget 2021: २०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य; नागपूर आणि नाशिक मेट्रोची घोषणा

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -