घरदेश-विदेशकोरोनाचा कहर: अमेरिकेनंतर 'या' देशात सर्वाधिक कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू!

कोरोनाचा कहर: अमेरिकेनंतर ‘या’ देशात सर्वाधिक कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू!

Subscribe

स्पेन आणि रशियाच्या तुलनेत ब्रिटनमध्ये असणारी कोरोना व्हायरसच्या संसर्गाची एकूण रुग्णांची आकडेवारी कमी

कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेनंतर ब्रिटनमधील परिस्थिती सध्या सर्वात गंभीर आहे. मृत्यूच्या बाबतीत ब्रिटन जगात दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला असून तेथे कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल ३३ हजार ९९८ लोकांचा बळी गेला आहे, तर २ लाख ३६ हजार ७११ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे स्पेन आणि रशियाच्या तुलनेत ब्रिटनमध्ये असणारी कोरोना व्हायरसच्या संसर्गाची एकूण रुग्णांची आकडेवारी कमी आहे.

वर्ल्डोमीटरनुसार, जगभरात अमेरिकेनंतर स्पेन आणि रशियामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. येथे रूग्णांची संख्या अनुक्रमे २ लाख ७४ हजार ३६७ आणि २ लाख ६२ हजार ८४३ अशी आहे. ब्रिटनपेक्षा स्पेन आणि रशियामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या जास्त आहे, मात्र या दोन्ही देशांमध्ये कोरोनापासून बरे होणाऱ्या रूग्णांचा दर देखील चांगला आहे. मृत्यूच्या बाबतीत स्पेन जगात पाचव्या क्रमांकावर आहे तर रशिया १८व्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, जगातील २१३ देशांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे. २१३ देशांमध्ये ४६ लाख २४ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून तीन लाखाहून अधिक लोकांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तसेच साडे सतरा लाखांहून अधिक कोरोना रूग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याच आला आहे.

जगात कोरोनाचा सर्वाधिक मृत्यू कोठे झाला?

  • अमेरिका – ८८ हजार ५०७ रूग्णांचा मृत्यू
  • ब्रिटन – ३३ हजार ९९८ रूग्णांचा मृत्यू
  • इटली – ३१ हजार ६१० रूग्णांचा मृत्यू
  • फ्रान्स – २७ हजार ५२९ रूग्णांचा मृत्यू
  • स्पेन – २७ हजार ४५९ रूग्णांचा मृत्यू
  • ब्राझील – १४ हजार ८१७ रूग्णांचा मृत्यू
  • बेल्जियम – ८ हजार ९५९ रूग्णांचा मृत्यू
  • जर्मनी – ८ हजार ००१ रूग्णांचा मृत्यू
  • इराण – ६ हजार ९०२ रूग्णांचा मृत्यू
  • नेदरलँड – ५ हजार ६४३ रूग्णांचा मृत्यू

Corona: कोरोनापुढे ‘हा’ देश जिंकला! ‘या’ पहिल्या देशानं कोरोनाला हरवलं!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -