क्वारंटाईन सेंटरमधून पळाला आणि त्याने घरी येऊन पत्नीचा हातच कापला, कारण….

छत्तीसगडमध्ये आलेला मजुराला त्याच्या गावातच क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

murder
प्रातिनिधीक फोटो

छत्तीसगडच्या जाशपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. क्वारंटाइन सेंटरमधून पळालेल्या एका स्थलांतरित मजुराने आपल्या घरी जाऊन आपल्या पत्नीवर हल्ला केला आहे. दुसऱ्या राज्यातून छत्तीसगड येथे आलेल्या मजुराला क्वारंटाईन करण्यात आले होते. पण क्वारंटाईनसेंटरमध्ये असताना त्याला त्याच्या पत्नीवर संशय आला. आपल्या पत्नीचे दुसऱ्या पुरूषाबरोबर प्रेमसंबंध आहे या संशयाने त्याने थेट घर गाठले.

काय घडलं त्या दिवशी

छत्तीसगडमध्ये आलेला मजुराला त्याच्या गावातच क्वारंटाईन करण्यात आलं. क्वारंटाइन सेंटरमध्ये असताना हा मजूर पत्नीला फोन करायचा, तेव्हा सतत तिचा फोन बिझी असायचा. दुसऱ्या कोणाबरोबर तरी बोलणे सुरु असायचे. बुधवारी रात्री त्याने पुन्हा फोन केला. त्यावेळी पत्नीचा फोन बिझी आला. . त्यामुळे त्याच्या मनात संशय बळावला. त्यामुळे चिडलेल्या मजुराने गच्चीवरुन उडी मारुन क्वारंटाइन सेंटर बाहेर पळ काढला. आणि त्याने क्वारंटाईनसेंटरमधून पळ काढला. त्याने आपलं घर गाठलं. त्यावेळी मोबाइलवरुन पत्नीचे कोणाबरोबर तरी बोलणे सुरु असल्याचे त्याने पाहिले. चिडलेल्या मजुराने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली व पत्नीचा हातच कापून टाकला.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या जखमी पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी महिलेला रुग्णालयात नेले पण तो पर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे डॉक्टरांना हात जोडण्याची शस्त्रक्रिया करता आली नाही.


हे ही वाचा – औरेया अपघात : एक कप चहाने वाचवले मजुरांचे प्राण, नाही तर….!