घरदेश-विदेशनिस्वार्थी लोकांना जास्त मुलं होतात, नव्या अभ्यासाचे निष्कर्ष!

निस्वार्थी लोकांना जास्त मुलं होतात, नव्या अभ्यासाचे निष्कर्ष!

Subscribe

निस्वार्थी होण्याचे अनेक फायदे असल्याचं आपण आजवर ऐकत होतो. पण आता एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. निस्वार्थी लोकांना जास्त मुलं होतात आणि त्यांना जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळतात असा निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला आहे.

आपल्याकडे अनेक संतांनी, अनेक पुस्तकांमध्ये आणि ग्रंथांमध्येही निस्वार्थी स्वभाव ठेवण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे. निस्वार्थी स्वभावामुळे कशी प्रगती होते याचेही अनेक दाखले या ग्रथांमध्ये आणि साधू संतांनी दिले आहेत. मात्र, आता एका शास्त्रीय पद्धतीने करण्यात आलेल्या अभ्यासात ही बाब सिद्ध झाली आहे. या अभ्यासातून निघालेल्या निष्कर्षांनुसार निस्वार्थी लोकांची आयुष्यात लवकर प्रगती होते. विशेष म्हणजे, निस्वार्थी लोकांना जास्त मुलं होतात आणि त्यांना जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळतात, असं या निष्कर्ष मांडणाऱ्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

स्टॉकहोम युनिव्हर्सिटी, दि इन्स्टिट्युट फॉर फ्युचर स्टडीज आणि युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना या संस्थांमधल्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

- Advertisement -

अमेरिका आणि युरोपमध्ये प्रामुख्याने हा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार निस्वार्थी लोकांना निस्वार्थी लोकांना जास्त मुलं होतात आणि त्यांना जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळतात. याशिवाय निस्वार्थी लोकांना नोकरीमध्ये जास्त पगार वाढवून मिळतो असं देखील या निष्कर्षांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. स्टोकहोम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि या संशोधनातील एक संशोधक किम्मो एरिक्सन यांनी ही माहिती दिली आहे. याआधीही झालेल्या मानसशास्त्रातील संशोधनामध्ये निस्वार्थी लोकं अधिक सुखी असतात आणि त्यांचे सामाजिक संबंध अधिक चांगले असल्याचं स्पष्ट झालं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -