घरमहाराष्ट्रगोरेगाव येथे बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा आयोजित

गोरेगाव येथे बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा आयोजित

Subscribe

गोरेगाव येथे बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या असते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

पुणे, नवी मुंबई, नाशिक तसेच कोल्हापूर येथे प्रचंड प्रतिसाद लाभल्यानंतर २० ऑक्टोबर रोजी गोरेगाव येथे पाचवा बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

युवा उमेदवारांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई

महाराष्ट्रातील मराठी तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, या हेतुने महाराष्ट्र शासनाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. शनिवारी गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे सकाळी दहा वाजता पाचव्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी आतापर्यंत सुमारे पाच हजार तरुणांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे. तसेच दोन हजार उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे. मुंबई आणि परिसरातील १३० कंपन्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. दहावी-बारावी उत्तीर्ण ते आयटीआय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, बँकिंग आदी शाखांत पदवी घेतलेल्या तरुण-तरुणींना या रोजगार मेळाव्यातून रोजगार मिळणार आहे. नोंदणी केलेल्या तरुणांचा कल लक्षात घेऊन त्यांना संबधित कंपन्यांच्या दालनात मुलाखती घेण्यात येणार असून नियुक्ती ऑफर पत्र दिले जाणार आहे. या रोजगार मेळाव्याला मुंबईतील जास्तीत जास्त युवा उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -