घरताज्या घडामोडीUP Election 2022: सपा अध्यक्ष मुलायम सिंह यादवांच्या घरातच फूट, भाजपमध्ये प्रवेश...

UP Election 2022: सपा अध्यक्ष मुलायम सिंह यादवांच्या घरातच फूट, भाजपमध्ये प्रवेश करणार सून

Subscribe

अपर्णा यादव समाजवादी पार्टीत असतानाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करत होत्या. उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या अपर्णा यादव अनेकवेळा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत दिसल्या आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ च्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे पक्षांतर करण्याचा प्रकार सुरु झाला आहे. भाजपच्या मंत्र्यांनीच पक्षांतर केल्यामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. या चर्चा सुरु असताना आता समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या घरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुलायम सिंह यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपच्या मंत्र्यांसह अनेक कार्यकर्ते समाजवादी पार्टीमध्ये सामील झाले आहेत. अपर्णा यादव यांच्यासह आईपीएसची नोकरी सोडलेले असीम अरुणसुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची छोटी सून अपर्णा यादव भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मागील काही दिवसांपासून त्या भाजपच्या संपर्कात होत्या. अपर्णा यादव लखनऊमध्ये भाजप प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश करतील. यावेळी उत्तर प्रदेश निवडणूक सहप्रभारी आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह उपस्थित असतील.

- Advertisement -

अपर्णा यादव कोण आहेत?

अपर्णा यादव या मुलायमसिंह यादव यांचा मुलगा प्रतीक यादवच्या पत्नी आहेत. अपर्णा यादव यांनी २०१७ मध्ये समाजवादी पार्टीच्या तिकीटावर लखनऊमधील कैंट जागेवर विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचा भाजप उमेदवार रीता बहुगुणा जोशी यांच्या समोर हार पत्कारावी लागली होती. अखिलेश यादव यांनी स्वतः यावेळी अपर्णा यांच्यासाठी प्रचार केला होता. जोशी खासदार निवडून आल्यानंतर पुन्हा भाजपने त्याच जागेवर निवडणूक जिंकली होती.

अपर्णा यादव समाजवादी पार्टीत असतानाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करत होत्या. उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या अपर्णा यादव अनेकवेळा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत दिसल्या आहेत.

- Advertisement -

अपर्णा यादवांचै मौन

अपर्णा यादव भाजपमध्ये प्रवेश कऱणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याशी अनेक जण संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा खऱ्या आहेत का? असे प्रश्न अपर्णा यादव यांना करण्यात येत आहेत. पंरतु या सर्व प्रकरणावर अपर्णा यादव यांनी अद्याप स्पष्टीकरण दिलं नाही. मौन धारण करुन समाजवादी पार्टीवर दबाव बनवण्यात येत असल्याच्या चर्चा सुरु आहेत, दबाव बनवल्यास त्यांना लखनऊ केंटमधून निवडणूक लढवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : Assembly Election 2022 : गोव्यातील राजकारण भूमाफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफियांच्या हाती; संजय राऊत यांचा आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -