घरCORONA UPDATEकचऱ्यात सापडलेल्या पीपीई किटशी चिमुरडे दिवसरभर खेळले, आता डॉक्टर म्हणतात...

कचऱ्यात सापडलेल्या पीपीई किटशी चिमुरडे दिवसरभर खेळले, आता डॉक्टर म्हणतात…

Subscribe

उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातील अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.  ज्यामध्ये दोन मुले वापरलेल्या पीपीई किटवर लाकडाचा तुकडा घेऊन जात आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघून तुम्हालाही भिती वाटेल. या मुलांना ही पीपीई कीट स्मशानभूमीजवळील कचऱ्यात सापडला. त्यांनी त्याच्या उपयोग लाकडाचा तुकडा घेऊन जाण्यासाठी केला.

ही दोन्ही मुले आणि त्यांच्या पालकासह रेल्वे कर्मचारी क्वार्टर जवळील कॅंट भागात राहतात. दोन्ही मुले भरतपूर येथील रहिवासी भटक्या जमातीतील आहेत. लॉकडाऊनमुळे ते आग्रा येथेच अडकले. मुलांनी सांगितले की जेव्हा ते पीपीई कीट घेऊन घरी पोहचले तेव्हा त्यांच्या कुटूंबाने त्यांना लवकरात लवकर तो फेकून देण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तो पीपीई कीट एका नाल्यात फेकला.

- Advertisement -

मुलाचे वडील ओमप्रकाश यांनी सांगितले की, मुले लाकूड आणण्यासाठी स्मशानभूमीत गेली होती. ते स्मशानभुमिच्या आजूबाजूला खेळत असताना तेथे त्यांना एका बॅगेत फेकलेले पीपीई किट सापडले. दोघांनाही त्याची अजिबात माहिती नव्हती. त्यांनी त्यावर लाकूड ठेवून घराकडे ओढत आणले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाविरोधात सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. कारण वापरेला पीपीई किट कोणाच्या संपर्कात आल्यास संसर्ग होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

एनआयशी बोलताना एसएन मेडिकल कॉलेजचे प्रा. प्रभात अग्रवाल म्हणाले की केवळ कोरोना रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वापरलेले पीपीई किट धोकादायक असू शकतात. ते म्हणाले की जर किट तीन दिवस जुना असेल तर त्यामुळे कोणतेही नुकसान होऊ शकत नाही. तीन दिवस त्यावर व्हायरस रहात नाही.

आग्रा जिल्ह्याचे सीएमओ डॉ. आरसी पांडे यांनी सांगितले की, त्यांनीही हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओमध्ये दिसलेला पीपीई किट सरकारने खरेदी केलेला नाही. त्याचा रंग वेगळा आहे. ते म्हणाले की, वैद्यकीय कचरा विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही खासगी कंपनीशी करार केला आहे. रुग्णालयाचे असे सर्व धोकादायक कचरा प्रथम निर्जंतुकीकरण केले जातात. त्यानंतर त्यांना स्वतंत्र वाहनातून विद्युत भट्टीमध्ये टाकले जाते. नंतर वाहने देखील निर्जंतुकीकरण केली जातात.


हे ही वाचा – मिसकॉलवर झालेल्या प्रेमासाठी त्याने केला अहमदाबाद ते बनारस पायी प्रवास, पण…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -